Ticker

6/recent/ticker-posts

सारखणी व वाई बाजार येथील सहा ऑटोमोबाईल्स व टू व्हीलर सर्विसिंग सेंटर वर एकूण 42 हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाचे कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल चे बनावट डबे बाळगून आले आहेत


सारखणी व वाई बाजार येथील सहा ऑटोमोबाईल्स व टू व्हीलर सर्विसिंग सेंटर वर एकूण 42 हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाचे कॅस्ट्रॉल इंजिन ऑइल चे बनावट डबे बाळगून आले आहेत.

त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र फडके यांच्या आदेशाने गुन्हा नोंद करून 

या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

काल झालेल्या संयुक्त छापेमारी पोलीस उपनिरीक्षक श्री. भोपळे, पोलीस नाईक

 श्री गुव्हाडे,पोलीस कॉन्स्टेबल सोनु सोनसळे व गजानन नंदगावे यांनी चोख कामगिरी बजावली.

एकंदरीत कॅस्ट्रॉल कंपनीचे अधिकारी व सिंदखेड पोलिसांनी केलेल्या संयुक्त छापेमारी 

मुळे खाद्यान्न नामांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू हलक्या दर्जाच्या व बनावट स्वरूपाच्या विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
कॅस्ट्रॉल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईच्या धर्तीवर माहूर आणि किनवट तालुक्यातील 

अत्यंत महत्त्वाच्या व मोठ्या बाजारपेठ असलेल्या सारखणी व वाई बाजार येथे अन्न व औषध प्रशासन,राज्य विक्रीकर विभाग, 

स्थानिक पोलीस व तसेच खाद्यान्न व चैनीच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या नामांकित कंपन्यांनी संयुक्तरित्या 

या दोन्ही बाजारपेठेत तपासणी मोहीम राबविल्यास अनेक वस्तूमधील बनावट 

पणा उघडकीस येऊन जनतेच्या आरोग्याशी खेळ करून आर्थिक छळ करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.