Ticker

6/recent/ticker-posts

दोनच दिवसात 50 टक्के लसीकरण हे अतिदुर्गम "लक्कडकोट" च्याग्रामनायकांच्या समन्वयाचं फलित -गट विकास अधिकारी सुभाष धनवे


दोनच दिवसात 50 टक्के लसीकरण हे अतिदुर्गम "लक्कडकोट" च्या
ग्रामनायकांच्या समन्वयाचं  फलित  
-गट विकास अधिकारी सुभाष धनवे

किनवट : "मिशन कवचकुंडल" अंतर्गत  गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या लोकजागृतीमुळे एकाच दिवशी 45 व्यक्तींना लस व 

दोनच दिवसात 50 टक्के लसीकरण हे आशादायी चित्र तालुक्यातील अतिदुर्गम लक्कडकोट या गावी दिसून आलं आहे. 

ग्रामविकासाला चालना देणाऱ्या ग्रामनायकांच्या समन्वयाचं हे फलित आहे, असे गौरोद्गार गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी काढले.
      

  पैनगंगेच्या तिरालगत असलेल्या व अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी हालअपेष्टा सोसलेल्या 

" लक्कडकोट " या अतिदुर्गम गावात बुधवार (दि.13) रोजी आरोग्य कर्मचारी, ग्रामसेविका, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी व आशावर्कर यांनी एकत्र येऊन " 

कोविड -19 लसीचे महत्व सर्व गावकऱ्यांना पटवून दिलं. याविषयीच्या शंका, कुशंका, अफवा, भिती दुर केली. 

तेव्हा 71 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक  नामदेम तुकाराम डाकोरे व 65 वर्षाचे कानबा मिठू भोपे यांनी सर्वप्रथम कोवीड लस घेऊन 

गावकऱ्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर एकाच दिवसात 45 व्यक्तींनी   कोवीडची लस घेतली. तसेच गुरुवार

 (दि. 14 ) रोजी 40 लाभार्थींना लस टोचण्यात आली. अतिदुर्गम गावांमधील लक्कडकोटचं लसिकरण हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
      

या वेळी बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी डी.जे. राठोड , आरोग्य सेविका श्रीमती जे. व्ही. कन्नाके, 

आशा वर्कर सविता चंदनवार, अंगणवाडी मदतनिस शितल भोपे

 यांनी लसिकरणाचे काम चोखपणे बजावले. सरपंच गणपत भोपे व  ग्रामसेविका श्रीमती एम. एम. पांढरे  यांनी लसिकरणास सहकार्य केले. 
       

  गावातील शिक्षक तथा कोरोना लसीकरण जनजागृती ध्वनीचित्रफितीचे गीतकार, गायक, 

कलावंत रुपेश मुनेश्वर यांनी  कोवीड लस घेण्याविषयी सर्व गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली. 
     

    येत्या दोन तीन दिवसात गावातील सर्व पात्र व्यकींनी लसिकरण पूर्ण करून घेण्याचे कबूल केले.
        

 जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतील

 ''मिशन कवचकुंडल'' या विशेष लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी 

सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी विशेष उपक्रमाची आखणी केली. 
त्यानुसार गट विकास अधिकारी सुभाष धनवे, 

गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, बालविकास प्रकल्पाधिकारी 

आश्विनी ठकरोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे

 यांनी एकत्र बसून आखणी केली. ग्राम पातळीवर कार्यरत सर्व कर्मचारी यांनी समन्वय साधून एकाचवेळी गावकऱ्यांचं प्रबोधन करायचं. 

हाच संदेश घेऊन लक्कडकोट येथील ग्रामनायकांनी एकत्र येऊन जनजागृती केली व दोनच दिवसात 50 टक्के लसीकरण केलं. याचचं अनुकरण इतर गावांतील कर्मचाऱ्यांनी करावं.