Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील कोसमेट येथील एका शाळकरी विदयार्थाचा विज पडुन मूत्यु झाला असुन दुसरा शाळकरी विदयार्थी देखील गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि. 9 ऑक्टोंबर शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे


 किनवट तालुक्यातील कोसमेट येथील एका शाळकरी विदयार्थाचा विज पडुन मूत्यु झाला असुन दुसरा शाळकरी विदयार्थी देखील गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि. 9 ऑक्टोंबर शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे

दि 9 ऑक्टोंबर शनिवार दुपारच्या वेळेत ईस्लापुर, कोसमेट परिसरात विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने या पावसाने व विजेच्या 

कडकडाटाने आसरा घेण्यासाठी कोसमेट येथील शाळकरी विदयार्थी सुशांत गजानन कामीलवाड व तनमन देविदास वाघमारे 

हे दोघेही 11 वर्षीय विदयार्थी इयता 5 व्या वर्गात कोसमेट येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते 

शनिवारचा दिवस असल्याणे
दुपारच्या सुटीतुन शाळेतुन दोघेही जण घराकडे गेले व त्यानंतर 

त्यांनी आपल्याघरच्या बक-या सकाळपासुन उपासी असल्याणे बक-या घेवुन गावाच्या लगत असलेल्या 

शेतकरी रामराव कडबे यांच्या शेतात बक-या चारत असताना अचानक आकाश भरुन येवुन पाउस सुरु झाला

 त्याच दरम्यान विजेच्या कडकडासह पाऊस जोरात चालु झाला असल्याचे लक्षात
 येताच ते दोघेही जण आसरा घेण्यासाठी झाडाखाली थांबले असता त्याच्यांवर विज कोसळल्याने 

यात सुशांत गजानन कामीलवाड वय 11 वर्ष इयता 5 वी वर्गात शिक्षण घेणाया या विदयार्थाचा जागीच मृत्यु झाला आहे 

त्याचा सोबती तनमन देविदास वाघमारे इयता 5 वी वय 11 वर्षे रा.कोसमेट हा विदयार्थी गंभीर जखमी झाल्याने या विदयार्थावर ईस्लापुर 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करुन पुढीलउपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ 
व्यक्त होत आहे