Ticker

6/recent/ticker-posts

के टी आय एल कंस्ट्रक्शन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- साबेर शेखअर्धापूर (खतीब अब्दुल सोहेल)अर्धापूर ते भोकर फाटा रस्त्याचे दुरुस्ती चे काम के टी आय एल कंस्ट्रक्शन कंपनीने घेतले आहे परंतू सदर काम संथ गतीने तसेच निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे




के टी आय एल कंस्ट्रक्शन वर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करा- साबेर शेख
अर्धापूर (खतीब अब्दुल सोहेल)


अर्धापूर  ते भोकर फाटा रस्त्याचे दुरुस्ती चे काम के टी आय एल कंस्ट्रक्शन कंपनीने घेतले आहे 

परंतू सदर काम संथ गतीने तसेच निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे

 रस्त्याला जागो जागी खड्डे पडले आहेत त्या मुळे अपघात होऊन अनेक जणांचा जीव गेला आहे. 

त्या मुळे सदर  के टि आय एल कंस्ट्रक्शन कंपनी वर सदोष मनुष्य वधाचा 

गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते शेख साबेर 

यांनी अर्धापूर पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या कडे केली आहे. 

गुन्हा दाखल न केल्यास नाईलाजास्तव न्यायालयात जावे लागेल असे निवेदनात नमूद केले आहे.