खासदार हेमंत पाटलासह शिवसैनिकांवर दाखल गुन्हे तात्काळ वापस घेण्यात यावे-शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील
किनवट प्रतिनिधी (राज माहुरकर)
वसमत येथील शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या वादावरून
वसमत पोलिसांनी स्थानिक व ग्रामीण भागातील शिवसैनिकांवर खासदार हेमंत पाटलासह
विनापरवानगी गर्दी केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ किनवट शिवसेना तालुकाप्रमुख
बालाजी मुरकुटे पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक जिल्हाधिकारी
यांच्याकडे घटनेच्या निषेधार्थ निवेदन देऊन दाखल गुणे मागे घेण्यात यावे असे निवेदन देण्यात आले
असून सदर निवेदन कार्यालयातील प्रतिनिधी श्री कांबळे यांनी स्वीकारले आहे
निवेदनामध्ये दिनांक 13/10/2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मिरवणूक काढून नियोजित जागेवर
अनावरण करण्यात आले यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांवर विनापरवानगी गर्दी जमवण्याचा ठपका ठेवून
खासदार हेमंत पाटलासह उपस्थित शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहे सदर गुन्हे मागे घेण्यात यावे असे निवेदन
किनवट शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले
यावेळी व्यंकट भंडरवार तालुका संघटक , संतोष यलचलवार शहर प्रमुख उपतालुकाप्रमुख अतुल दर्शनवाढ,
मारुती सुंकलवाड दिशा समिती सदस्य ,उपसंघटक सुरेश घुम्मडवार, माजी सैनिक तुकाराम मशीदवार