बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट येथे हिंदी , संगणक विभाग व महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारत
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १२/१०/२०२१ रोजी सकाळी ठीक १०वा. एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
"कार्यालयीन हिंदी में संगणक का प्रयोग " या विषयावर प्रसिद्ध विचारवंत मथन करणार आहेत.
या वेबिनारचे आयोजन किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संगोष्ठीचे उद्घाटन सत्राचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड हे राहणार असून
या कार्यक्रमात डॉ. जोंगेद्रसिंग बिसेन प्र. कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड,या वेबिनारचे उद्घाटन करणार आहेत.
डॉ. दामोदर खडसे माजी सहाय्यक महाप्रबंधक, बॅक आॅफ महाराष्ट्र ,श्यामसुंदर कथूरिया संयुक्त संचालक राजभाषा ,कर्मचारी राज्य वीमा निगम,
नई दिल्ली, प्रो. अवधैश कुमार महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा, डॉ. सुनिल कुलकर्णी हिंदी विभागप्रमुख कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ,
जळगाव, प्राचार्य डॉ रावसाहेब जाधव अध्यक्ष हिंदी अध्ययन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ,
रुपेश दलाल शाखा प्रबंधक, महाराष्ट्र ग्रामीण बॅक ,किनवट ,राहूल दवणे शाखा सहाय्यक प्रबंधक,
महाराष्ट्र ग्रामीण बॅक, किनवट हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.हे वेबिनार दोन सत्रात संपन्न होणार आहे.
या वेबिनारमध्ये जास्तीत जास्त अभ्यासक, नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावे असे आहवान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,
पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, हिंदी विभागप्रमुख प्रा. शेषराव माने, संगणक विभागप्रमुख डॉ .योगेश सोमवंशी, या वेबिनारसाठी सहकार्य डॉ. आनंद भालेराव, डॉ. जी. बी. लांब,