Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि २१ मिशन कवचकुंडल अंतर्गत जिल्हा प्रशासनाने १०० टक्के लसिकरण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या अणुषंगाने जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांच्या आहवानाला प्रतिसाद देत


किनवट ता.प्र दि २१ मिशन कवचकुंडल अंतर्गत जिल्हा प्रशासनाने १०० टक्के लसिकरण करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या अणुषंगाने

 जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व तहसिलदार डॉ मृणाल जाधव यांच्या आहवानाला प्रतिसाद देत

 बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागाच्या वतीन किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड 

यांच्या मार्गदर्शनाखाली  आज दिनांक २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोरोना विषाणु प्रतिबंधक लसिकरणाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष पद किनवट शिक्षण संस्थेचे संचालक व कॉग्रेसचे 

ज्येष्ठ नेते नारायणराव सिडाम यांनी भुषवले तर उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ उत्तम धुमाळे यांनी केले. 

तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवराज बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ गजानन वानखेडे, अधिक्षक राजेंद्र धात्रक, 

समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विजय खुपसे, आरोग्य कर्मचारी प्राजक्ता धोकपांडे, संदिप चव्हाण आदिची उपस्थिती लाभली. 
तर आयोजित कार्यक्रमाच्या सुरवातील मान्यवरांचे पुष्पगुच्छव्दारे स्वागत करण्यात आले

 तर यावेळी प्रास्ताविकामध्ये बोलतांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरषोत्तम येरडलावार म्हणाले कि, 

देशात लसिकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु असुन त्यामध्ये सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे, 

कोरोना विषाणुच्या सुरवातील असे वाटत होते कि आता मानवाचे अस्तित्व 

या भुतलावर राहते कि नाही ? परंतु देशातील शास्त्रज्ञानी मेहनत करुन मानव जातीच्या कल्याणाकरिता लसी ची निर्मिती केली 

त्यामुळे मानव जातीच्या कल्याणाकरिता प्रत्येकाला लस घेणे अत्यंत आवश्यक आहे 

अशामध्ये प्रत्येकाने लसिकरण मोहिमे मध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे, 
१८ वर्ष वया नंतरच्या प्रत्येकाला ह्या मोहिमे मध्ये सहभागी होता येणार आहे त्यामुळे प्रत्येकानी 

या मोहिमेत सहभाग नोंदवुन आपल्या देशाला कोरोना मुक्त करावे असे प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांनी यावेळी सांगितले.


या लसिकरण कार्यक्रमाचे प्रचार व प्रसार करुन ते यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा 

योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषेराव माने, प्रा. सुलोचना जाधव, डॉ लता पेंडलवार, स्वयंसेवक करण वर्मा, निखिल खराटे, 

कु.पुर्वषी राठोड आदींनी केले. तर लसिकरणा मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी एकुण ३१ विद्यार्थ्यांनी लस घेतली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा.शिवदास बोकडे, प्रा. आम्रपाली हटकर, प्रा. पंजाब शेरे, प्रा.शुभांगी दिवे, 

प्रा. खामकर, प्रा. एस.एस काझी, प्रा मधुकर पवार, यमुना कुमरे, आशा शिरपुरकर, प्रा. प्रल्हाद जाधव, प्रा. जय चव्हाण, 

विद्यार्थी अंजली पुरी, प्रतिक्षा वाटोरे यांच्या सह शिक्षक व प्राध्यापक उपस्थित होते. 

तर लस घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व कर्मचा-यांचे कार्यक्रमाधिकारी प्रा.शेषेराव माने यांनी आभार मानले.