किनवट तालुक्यातील अंबाडी येथील एका घरातील घरगुतू वापराचे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली.
यात जवळपास एक लाखाच्या संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली.
ही घटना ४ ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला घडली.
राष्ट्रपाल कचरू डांबारे यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घराला आग लागली.
त्यामध्ये श्री राष्ट्रपाल कचरू डांबारे यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
४ ऑक्टोबर च्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेने खळबळ उडाली असून किनवट नगर परिषदेच्या
अग्निशामक दलाने सायंकाळी ही आग आटोक्यात आणली.
त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
त्यामध्ये घरगुती साहित्य,
टीव्ही, कुलर, पंखा व संसारोपयोगी
साहित्य
तसेच धान्य, कपडे, शिलाई मशीन,
असे एक लाख रुपयांचे साहित्य या आगीत जळून खाक झाले.