वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत ; खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
-------------------------------------
हिंगोली /वसमत : मागील ४० वर्षांपासून असलेल्या मागणीची वसमतवासियांची प्रतीक्षा संपून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्याला आणि मिरवणुकीला खासदार हेमंत पाटील
यांची प्रमुख उपस्थिती होती . राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी लवकरच कृती समितीच्या शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले .
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा असावा या याकरिता
वसमतवासिय मागील ४० वर्षांपासून मागणी करत होते . मागच्या २ वर्षात यावर तातडीने कारवाई व्हावी
याबाबत कृती समिती खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने कामाला लागली होती.
या मागणीला आणि कृती समितीच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर
आज ( दि. १३ ) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा वसमत शहरात दाखल झाला .
मोठ्या थाटामाटात आणि ढोल-ताशा, लेझीम व झांजपथक अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने आगमन झाले.
प्रचंड शिवप्रेमी जनसमुदायाच्या साक्षीने हा सोहळा पार पडला व शिवभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने वसमत शहर दणाणून गेले.
या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील
यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आमंत्रित करण्यासाठी सर्व शिष्टमंडळासह लवकरच भेट घेणार आहे असे सांगितले.
याप्रसंगी पुतळा समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुंदडा, कार्याध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,
आ. चंद्रकांत (राजू ) नवघरे, उपकार्याध्यक्ष शिवाजीराव जाधव, अब्दुल हफिज अब्दुल रहेमान, सचिव सुनिल भाऊ काळे,
सहसचिव आनंद बडवणे, कोषाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार, सहकोषाध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, सदस्य सिताराम म्यानेवार ,
शिवाजी अडलिंगे, दिपक हाळवे, राजेश पवार, चंद्रकांत देवणे, यशंवतराव उबारे, शिवसेना तालुका प्रमुख राजु चापके , माजी सभापती प्रल्हाद राखोंडे,
युवासेना जिल्हा प्रमुख कन्हैया बाहेती ,युवासेना उपजिल्हा प्रमुख ईश्वर तांबोळी, माजी सभापती राजेश पाटील इंगोले, देवीदास पाटील कऱ्हाळे , शहरप्रमुख काशिनाथ भोसले,