Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे पकडलेला ६०० कट्टे राशन चा गहू खामगांव येथील शासकीय गोदामातीलच


अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे पकडलेला ६०० कट्टे राशन चा गहू खामगांव येथील शासकीय गोदामातीलच  

 *खामगाव येथील शासकीय धान्य गोदाम व्यवस्थापक अमोल बाहेकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल भगत व धान्य वाहतूक  कंत्राटदार यांच्या वर कडक कार्यवाही करा* 

*नरेंद्र म्हस्के सामाजिक कार्यकर्ता*


 का.प्र.खामगांव येथुन शासकीय धान्य  गोदामातून जनतेचा गहू काळ्या बाजारात नेहमीच विक्रीसाठी जात असतो 

परंतु आजपर्यंत कधीच मुख्य सुत्रधार कधीच गजाआड झाला नाही व कोणतीच ठोस  कारवाई झाली नाही 

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे पकडलेला गहू हा  अमोल बाहेकर व्यवस्थापक असलेल्या शासकीय गोदामातील असुन

 त्यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना तात्काळ निलंबित करावे
शासकीय धान्य गोदाम व्यवस्थापक अमोल बाहेकर 
यांना धान्याची विक्री करीता सहकार्य करणारे पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल भगत यांच्यावर सुध्दा तात्काळ कार्यवाही करुन 

त्यांना निलंबित करावे तसेच धान्याची वाहतूक करणारा संबंधित 
कंत्राटदारांवर कार्यवाही करुन त्याचा कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावा 

चौकट *असा नेण्यात आला होता गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी*  काळ्या बाजारात विक्री करीता 

जानारा गहू खामगाव येथील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील शासकीय धान्य गोदामातून गहू प्रथम साई जिनींग

 येथे हलविण्यात आला व नंतर त्यांची काळ्या  बाजारात विक्रीसाठी नेत असतांना तो गव्हाचा ट्रक बाळापूर 

येथे पकडण्यात आल्यावर काही तासांतच खामगाव येथील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळील शासकीय धान्यं गोदामांची लेव्हल बरोबर करण्यासाठी 

*गोदाम व्यवस्थापक अमोल बाहेर व पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल भगत* यांनी रातोरात सर्व नियम धाब्यावर ठेवत

 *MH 18 M 9366* या वाहनाव्दारे बाहेरुन गहू आणून गोदामात खाली करत व्यवस्थित गोदामांची लेव्हल करण्यात आली 

त्याचे *चित्रीकरण (व्हिडिओ)* माझ्याकडे असुन मि संबंधित विभागाकडे तक्रार, स्मरण पत्र देऊनही कार्यवाही होत नाही म्हणून कुंभकर्णी झोपेत असलेल्या 

अधिकाऱ्यांना झोपेतून जागविण्याकरीता व संबंधितांनवर कार्यवाही करीता मला एक दिवशीय लक्षवेधी उपोशन करावे लागत आहे तरी संबंधितावर कार्यवाही व्हावी