Ticker

6/recent/ticker-posts

गोकुंदा ग्राम पंचायतीच्या हद्दीत सुमार दर्जाचे विद्युत साहीत्य बसविण्याचा सपाटा गोकुंदा वासियांची चौकशीची मागणी


गोकुंदा ग्राम पंचायतीच्या हद्दीत सुमार दर्जाचे विद्युत साहीत्य बसविण्याचा सपाटा  गोकुंदा वासियांची चौकशीची मागणी

किनवट,दि.२९ :  ग्राम पंचायतीवर प्रशासक असल्याचा फायदा उचलत व प्रशासक जास्त लक्ष देऊ शकणार नाही, 

हे ओळखून गोकुंद्याच्या  ग्रामसेवकांनी अत्यंत घाई गडबडीत अत्यंत सुमार दर्जाचे विद्युत खांब, 

पथदीवे(आय.एस.आय.) मार्क नसणारे विद्युत साहीत्य बसविण्याचा  सपाटा सुरु केला आहे. हे साहीत्य किती काळ टिकेल,

हे लवकरच कळेल.या सुमार दर्जाच्या साहीत्याची सक्षम यंत्रणे मार्फत 

चौकशी करावी व यात दोषी असणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करावी,

अशी मागणी गोकुंदा ग्रामवासी करीत आहेत.
   

 किनवट चे उपशहर अशी ओळख असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या 

गोकुंदा (ता. किनवट) ग्रामपंचायती मधील सर्व वार्डमध्ये पथदिवे व सर्व खांबावरचे पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, 

अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य चे तालुका अध्यक्ष श्री. आशिष यांनी ग्रामसेवक यांची भेट घेऊन नुकतीच  केली होती.
          

खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले होते.तसचे आता दिवस ही लवकर मावळत आहे.

काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधून येताना अंधारातच घरी यांव लागत आहे. 

त्यामुळे पालक व विद्यार्थी दोघेही त्रस्त आहेत.

काही वाईट प्रकरण घडण्याच्या आधी सर्व वार्ड मध्ये लवकरात लवकर पथदिवे व खांबावरचे पथदिवे लावण्यात यावेत, 

अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य,तालुका शाखेचे अध्यक्ष श्री. आशिष सलके यांनी ग्रामसेवक यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.
         

 अंधाराच्या समस्ये सोबतच नाल्या साफ - सफाई व कचरा गाडी ची समस्यां देखील श्री. आशिष सेल्के यांनी ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून दिली होती. 
सर्व वार्डामध्ये नाल्या  या कचऱ्यांनी व पाण्यांनी तुडुंब भरलेल्या आहेत,

तर काही वार्डामध्ये नाली साफ - सफाई कामगार हे बऱ्याच महिन्यांपासून आलेले नाहीत. 

तसेच काही वार्ड मध्ये भरपुःःर कचरा व घाणीचा ढीग झालेले आहेत. 

त्यामुळे वार्ड मध्ये दुर्गंधी चे व मच्छरांचे राज पसरले व वाढले आहे.पर्यायाने रोगराईचे प्रमाणही वाढले आहे. 

यामुळे कचरा गाडी व नाली सफासफाई कामगारांना दर आठवड्याला सर्व वार्ड मध्ये पाठवावे, 

अशी विनंती ही आशिष सेलके यांनी ग्रामसेवक यांच्याकडे केली होती.
     
 त्यावेळी येत्या काही दिवसांमध्ये सर्व वार्ड मधील पथदिवे व खांबावरचे 

पथदिवे आणि नालीसाफसफाई व कचरा गाडी या सर्व समस्या सुटणार, 

अशी ग्वाही ग्रामसेवक यांनी श्री. आशिष यांना दिली होती.

अभ्यासु व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक अशी प्रतिमा असणारे ग्रामसेवक हे त्यांचा शब्द पाळुन आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहुन या 

सर्व समस्या खरंच आठ दिवसांत सोडणार का याची प्रतिक्षा नागरिक करीत होते.
   

दरम्यान,सदरील प्रकरणाची माहीती घेण्यासाठी व वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी सदरील ग्राम सेवकाशी अनेक वेळा भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.