Ticker

6/recent/ticker-posts

पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरालोकसहभागातून श्रमदानातून नाल्यावर साकारला दगडी रस्ता


पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा

लोकसहभागातून श्रमदानातून नाल्यावर साकारला दगडी रस्ता

किनवट : (तालूका प्रतिनिधी) 
पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत  पैनगंगा वन्यजीव अभयारण्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय खरबी व मॉर्निंग वॉक समूह किनवट  यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. 

वने व वन्यजीव संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवा तसेच नागरिकांमध्ये वन्यजीवा विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाने केलेल्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देऊन 

खरबी वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व मॉर्निंग वॉक समूह किनवट यांनी श्रमदान करून 12 फूट रुंद व 30 फूट लांबीचा दगडी रस्ता उभारण्यात आला.


नाल्यावर नैसर्गिकरित्या दगडी रस्ता तयार केल्यामुळे गस्तीचे वाहने फिरण्यास 
मदत होणार असून 

सदरच्या दगडी रचनेमुळे नाल्यामध्ये वन्यजीवांसाठी मुबलक पाणी साठून चांगल्या प्रकारे मृदा व जलसंधारण होणार आहे. 

यावेळी खरबी वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, वनपाल गाडी विजय सिंगनजुडे, वनपाल बोरी गजानन मोरे, 

वनरक्षक सुहाग कानडे, वैभव घोरपडे,  बाबासाहेब काशीदे, नविन इंगोले, मुजमुले, विजय टोंगळे, माणिक मोहिते, 

श्रीहरी बोंबले  तौफिक पठाण, पंकज राठोड तर मॉर्निंग वॉक समूह किनवट येथील  वि. बं. सेवाभावी संस्थेचे

बाळकृष्ण कदम, नगर सेवक अभय महाजन, गिरीष नेम्मानिवार, बंडू कंचर्लावार, अजय कदम, सिध्दांत नगराळे, किरन कस्तुरवार

 यांनी श्रमदान केले. जैवविविधता टिकवून वन्यजीवांचे संवर्धन करावयाचे असेल तर पर्यावरण संतुलित राहणे आवश्यक आहे. 

त्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक आहे.  

वन विभागामार्फत आयोजित कार्यक्रमास किनवट येथील मॉर्निंग वॉक टीम नेहमी उस्फूर्तपणे सहभागी होत असते. 

गेल्यावर्षीही वन्यजीव विभाग व मॉर्निंग वॉक समूहामार्फत श्रमदानातून 10 मीटर लांबीचा अनघड दगडी नालाबांध बांधण्यात आला होता. 
त्यांच्या या सहभागा बद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांनी मॉर्निंग वॉक समूह व वनकर्मचारी यांचे आभार मानले. 

तसेच यापुढेही त्यांचे असेच योगदान राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.