Ticker

6/recent/ticker-posts

किनवट,दि.८: लोकप्रतिनिधींच्या एका हस्तकाचा लाड पुरवण्यासाठी चाळीस वर्षापासूनच्या गांधीनगरवर नांगर फिरऊन पंचवीस गरीब व असह्य कुटूंबांना बेघर करण्याचा घाट नगर परिषदेने नुकताच घातला आहे


किनवट,दि.८: लोकप्रतिनिधींच्या एका हस्तकाचा  लाड पुरवण्यासाठी चाळीस वर्षापासूनच्या गांधीनगरवर नांगर फिरऊन 

पंचवीस गरीब व असह्य कुटूंबांना बेघर करण्याचा घाट नगर परिषदेने नुकताच घातला आहे. 

प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ 
असतांनाही प्रशासनाने 

७ आॅक्टोबर रोजी नोटीसा बजाऊन चोवीस तासाचा अल्टीमेटम दिल्याने नागरीक हवालदील झाले आहेत. 

गांधीनगरला हात लावाल तर त्याचे परिणामही गंभीर उमटतील आणि त्याची जबाबदारी यात गुंतलेल्या राजकारण्यांवर असेल, 

असा इशारा "माकपा", सह विविध 
संघटनांनी दिला आहे.
           

किनवट न.प.च्या प्रभाग क्र.पाच मध्ये हे गांधीनगर आहे. 

याच वार्डात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सभागृहात गटनेते म्हणून आहेत. 

तर दुसरी नगरसेविका ह्या भाजपाच्याच सत्तेत आहेत. 

या नगरसेवकांचे गांधीनगरवाशी मतदार आहेत. असे असतांना लोकप्रतिनिधीच्या एका हस्तकाचा

  हट्ट पुरवण्यासाठी पुरक बजेट देऊन  मांडवा जाणार्‍या लोकांच्या रस्त्याची सबब पुढे करुन गांधीनगरवर नांगर फिरऊ पहात असल्याचे 

रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार यांच्यासह "माकपा",चे जेष्ट नेते काॅ.अर्जून आडे व इत्तर संघटनांनी म्हटले आहे. 
           

किनवट नगर परिषदेने या गांधीनगरवाशीयांना ७ आॅक्टोबर रोजी जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. 

चोवीस तासाचा त्यांना अल्टीमेटम दिला आहे. 

दुसर्‍या बाजुने हेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना प्रशासनाने टोकाचे पाऊल का उचलावे याबद्धल लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 त्या वार्डाच्या नगरसेवकांच्या भूमीकेकडे तमाम किनवटकरांचे लक्ष लागले आहे. 

गांधीनगर वाचविण्यासाठी अनेकांनी कंबर कसल्याचे दिसते आहे.