Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : शहरातील रामनगर लसीकरण केंद्रावर सातुरवार परिवाराच्यावतीने लस घेणारास दोन किलो साखर भेट देण्याच्या उपक्रमामुळे एकाच दिवशी दोनशे एक्यांशी व्यक्तींनी लस घेतली


लस घ्या, 2 किलो साखर न्या ! या नव्या फंडा'ने विशेष लसीकरण मोहिमेस आली गती 

किनवट : शहरातील रामनगर लसीकरण केंद्रावर सातुरवार परिवाराच्यावतीने लस घेणारास 

दोन किलो साखर भेट देण्याच्या उपक्रमामुळे एकाच दिवशी दोनशे एक्यांशी व्यक्तींनी लस घेतली. 

लस घ्या, दोन किलो साखर न्या ! या नव्या फंडा'ने 75 तास विशेष लसीकरण मोहिमेला गती आली आहे.    
        
  याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

यांच्या संकल्पनेतील "मिशन कवचकुंडल " अंतर्गत 75 तास विशेष लसीकरण मोहीम 

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटमध्ये राबविण्यात येत आहे. 
शहरातील रामनगर केंद्रावर सामाजिक कार्यकर्ते नरसिंगराव नेम्माणीवार यांनी सकाळी दहा ते रात्री दहा

 या वेळेत लस घेण्यास येणारास दोन किलो साखर भेट देण्याचा उपक्रम आखला होता. 
       

  गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, नागरी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गुंटापेल्लीवार व मिडिया जनजागृती 

कक्षाचे उत्तम कानिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. 

आज वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पार्थ नरसिंग नेम्माणीवार यांनी वाढदिवसानिमित्त लस घेतली.

 याबद्दल तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी पुष्पगुच्छ व गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी ग्रंथ भेट देऊन त्याचे अभिष्टचिंतन केले. 

तसेच पहिल्या  लॉकडाऊन मध्ये 95 सलून कारागिरांना अन्नधान्य किट व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा 

येथे ऑक्सिजन कंसन्ट्रेटर मशीन भेट दिल्याबद्दल नरसिंगराव सातुरवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी नगरसेविका जिजाबाई मेश्राम, डॉ. अभिजीत ओव्हळ, डॉ. मोहन गोणेवार, 

सचिन कोंडापलकुलवार, मंडळ अधिकारी बुरकुले, तलाठी भालेराव यांची उपस्थिती होती.

 माजी नगरसेवक व्यंकटराव भंडारवार यांनी परिवारासह लस घेतली.

 वैद्यकीय अधिकारी डॉ.चक्रवर्ती चंद्रे, डॉ. ज्योती सोनटक्के, औषध निर्माता श्रीनिवास ताटे, 

परिचारिका सुजाता नलावडे हे या केंद्रावर लस देण्यास कार्यरत होते.

 केंद्रप्रमुख रमेश राठोड व संजय सिडाम यांनीही या केंद्राला भेट दिली. 

राजू पोलेनवर , विजय सातुरवार , प्रफुल्ल सुरोशे , राजू पोचानीवार , 

दिलीप गोडे , अनिल राठोड , संतोष काकडे , जि.पी. जाधव या शिक्षकांसह तौफिक खान 

किरण कोलगोटूवार व झियाउद्दीन खान या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन 

लोकांना लसीचे महत्त्व पटवून दिले आणि लाभार्थ्यांना लस घेण्यास केंद्रावर येण्यास प्रवृत्त केले. लस घ्या,

 दोन किलो साखर न्या ! या सातुरवार परिवाराच्या नव्या फंडा'ने एकाच दिवशी दोनशे एक्यांशी व्यक्तींनी लस टोचून घेतली.