Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रिच्या लेकींनो जगाच्या गतीबरोबर चालणारं तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवा गट शिक्षणाधिकारी अनिल महामुनेमानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल वाटप


सावित्रिच्या लेकींनो जगाच्या गतीबरोबर चालणारं तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवा 
गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

मानव विकास कार्यक्रमांतर्गत सायकल वाटप

किनवट : सावित्रिच्या लेकींनो जगाच्या गतीबरोबर चालणारं तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवा. 

शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचावा, अभ्यासाला जास्तीचा वेळ मिळावा 

या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत आपणास मोफत सायकल वाटप करण्यात येत आहे. 

याचा पुरेपूर लाभ घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवा, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.
         
येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीमध्ये 

शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. 

विमुक्त जन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. सचिन राठोड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गोकुळ भवरे, मानव विकास कार्यक्रमाचे समन्वयक उत्तम कानिंदे, मुख्याध्यापिका संगीता राठोड हे मंचावर उपस्थित होते. 
       

  पुढे बोलतांना श्री महामुने म्हणाले, अतिदुर्गम भागात दिवंगत प्राध्यापक इंद्रसिंग राठोड 

यांनी शाळा उघडून शैक्षणिक क्रांती केली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. 

मुलींनो कोरोनाच्या भयंकर स्थितीने अठरा महिने आपण शाळेत येऊन शिक्षण घ्यायला मुकलो. यापुढे नियमीत शाळा सुरु ठेवण्यासाठी

 सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना दूत म्हणून आपल्या कुटूंबातील व शेजारील सर्वांना "कोविड- 19 लस " घेण्यास प्रवृत्त करावे. 
        

  प्रकाश राठोड यांनी प्रास्ताविक केले. 
सुनील निकम यांनी सूत्रसंचालन केले.

 निलेश भिलवडीकर यांनी आभार मानले. 

शाळेपासून पाच किमीच्या आत
 राहणाऱ्या इयत्ता आठवीतील मुलींना 

मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए. थोरात, जी. बी. सुपेकर, 

शिक्षणाधिकारी (मा) प्रशांत दिग्रसकर यांनी सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या 

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चाळीस विद्यार्थिनींना मंजूर केलेल्या सायकलीचे वाटप करण्यात आले. 

यावेळी विद्यार्थिनीचे पालक आवर्जून उपस्थित होते.
         

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गोमाजी चव्हाण, व्यंकट उप्पे, सुनिता तोरणेकर, 

माया देवराय, माया देवतळे, छाया रिठे, सुनिता माजळकर, सुमिता राठोड, पी. एस. राठोड, 

संजय मंगनाळे व शिक्षकेत्तर कर्मचारी बळीराम राठोड, जाधव रणवीर, शोभा शिंदे, काशीनाथ आडे, कीर्ती वाढवे आदिंनी परिश्रम घेतले.