तक्षशिला बुद्धविहारात आश्विन पौर्णिमा 'काव्यपौर्णिमा' म्हणून साजरी..
प्रत्येक पोर्णिमा काव्यपोर्णिमा : क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम !
किनवट : क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने आश्विन पौर्णिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर गोकुंदा येथे काव्य पौर्णिमा साजरी करण्यात आली. सांगावाकार महेंद्र नरवाडे हे अध्यक्षस्थानी होते.
कविसंमेलनात स्थानिक कवींनी बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.
भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या वंदनेने कवी संमेलनाला सुरूवात झाली.
वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले.
त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी ठेवावे शुद्ध आचरण हेच बुद्धाचे सांगणे, कवयित्री वंदना तामगाडगे यांनी समाजाचा गाडा
आता नेकीने रेटा नीट, प्रा. एस. डी. वाठोरे यांनी सुरू झाली सतयुगाची नांदी, युवाकवी राजेश पाटील यांनी धम्म हा नवा दिला तू भीवा,
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रद्धास्थान आपलं,
अनिल उमरे यांनी राहो सुखाने हा मानव इथे, प्रा.सुभाष गडलिंग यांनी दु:ख गामी वळनावर
क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी ऊर्जास्रोत बाबासाहेब, सिमा नरवाडे यांनी आपण मस्तपैकी आनंदाच्या बीया पेरीत जावे..
अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.
संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची ऐका देऊनी ध्यान,
गायिका मंगला कावळे यांनी सुशिला,पंचशिला चला चला ग विहाराला,अक्षरा गोखले यांनी सुरेल गीते ऐकविली.
कवीसम्मेलनाध्यक्ष कवी महेंद्र नरवाडे यांनी हजारो वर्षाच्या वळवंटी तुझ्या भावनेला येऊदे आता धम्मपथावर अन मिळूदे बुद्धप्रकाश !
या रचनेने समारोप केला. कवीसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी आभार मानले. यावेळी सखाराम घुले, पत्रकार विशाल गीमेकर, संघपाल कौठेकर, सतीश विणकरे, संघमित्रा वाघमारे,