Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांचा वाढदिवस रजत हॉटेल भंडारा येथे मोठ्या उत्स साजरा करण्यात आला. 

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी शाल, पिंपळवृक्ष व स्मृतिचिन्ह देऊन पंकज वानखेडे यांचा सत्कार केला. 

तसेच सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम यांनी स्मृतिचिन्ह, 

पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विदर्भ सरचिटणीस शेखर बोरकर, 

भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, वंचितचे कार्यकर्ते व एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माजी समाज कल्याण सभापती चरणदास मेश्राम, अमित वैद्य राधेश्याम कावळे, 

नरेंद्र सुखदेवे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, अशोक गायधने, उमाकांत रामटेके, सुधीर रामटेके, गुलछन कावळे, 

अंकुर कावळे, धनपाल गडपायले व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 
पंकज वानखेडे यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे,

 राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.