Ticker

6/recent/ticker-posts

देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बांधवानो जागे व्हा ? होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत योग्य उमेदवार यांनाच मते द्या योग्य उमेदवार नसेल तर नोटा बटन वर मतदान करुन आपली नापसंती दाखऊन आपला संताप व्यक्त करा ? संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल


देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व  मतदार बांधवानो जागे व्हा ? होत  असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत योग्य उमेदवार यांनाच मते द्या योग्य उमेदवार नसेल तर नोटा बटन वर मतदान करुन आपली नापसंती दाखऊन आपला संताप व्यक्त करा ? संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल

      देगलुर 

         देगलुर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व सुजाण  मतदार बांधवानो जागे व्हा ? 

कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी न पडता आपला प्रश्न सतेत गेलेल्या आमदार यांना खालील प्रश्न विचारा 

१) मा. आमदार साहेब  दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार यांना मिळणारे दरमहा एक हजार रूपये मिळतात ते कसे जगतात? त्यात दोन वेळा दुधाचे पाकिट तरी येते काय? तेहि पाच महिने मिळत नाही? 

 आपणास व प्रशासकीय अधिकारी यांना दरमहा भरपुर वेतन असताना त्यात खर्च भागत नाही म्हणून अनेक भत्ते मिळतात पण दिनदुबळ्याच्या मताने आपण सतत गेल्याने दिनदुबळ्याचा विचार का होत नाही? 


२) दिव्यांग बांधवांना सर्व सामान्य व्यक्ती सारखे जीवन जगता यावे म्हणून आपणच संसदेत कायदा २०१६ ला करून पाच वर्षे झाले तरी ते कायद्याची आपणच अंमलबजावणी का करीत नाहीत ?  
     

 ज्या दिव्यांगाना जगात काय चाले ते दिसत नाही, ऐकु येत नाही, 

आपली अडचण बोलुन सांगता येत नाही तरी हक्क मिळावा म्हणून सतत शासन प्रशासन जागे करण्यासाठी आंदोलन करावे लागते आपणास संसदेत दिनदुबळ्याचे प्रश्न कधी मांडून न्याय दिला काय जिल्ह्यात


दिनदुबळ्यांना न्याय मिळावा म्हणून शेकडो मोर्चे, धरणे, आंदोलन,शेवटि दिनदुबळ्याना न्याय द्या न्याय हक्क मिळत नसेल तर स्वईच्छा  मरण्याची परवानगी मिळावी म्हणून 

मा,मुख्यमंञी व मंञी,प्रशासकिय अधिकारी यांनामा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या मार्फत निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे बेमुधत धरणे आंदोलन करून सुध्दा 

न्याय मिळावा म्हणून शेकडो दिव्याग सहभागी होऊन नांदेड जिल्ह्यात शेकडो आंदोलन केले असता आपण लोकप्रतिनिधी या नात्याने साधी आंदोलन स्थळी भेट दिली नाही. 
     

 दिनदुबळ्या जनतेचे कैवारी म्हणून आज मतासाठी आम्हास आश्वासन देऊन मते घेता पण साधी दखलही घेत नसल्यामुळे सर्व दिव्यांग, वृध्द निराधार, शेतमजूर,भुमीहिन,शेतकरी,


मतदार बाधवानो जागे व्हा! आपल्या एका मताची ताकदीने सतेत हि पाठऊ शकतो जे दिनदुबळ्याच्या हक्काचे संसदेत न्यायासाठी प्रश्न मांडत नाहि 

त्यांना घरी बसु शकता व या निवडणुकीत योग्य उमेदवार आपल्या दृष्टीने दिसत नसल्यास नोटा बटन वर मतदान करुन नापंसत उमेदवार आहेत 

हे दाखऊन देऊ शकता योग्य विचार करून उमेदवार यांनाच मते द्या पण मतदानाचा अधिकार आहे ते मतदान करा 

असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष  चपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी केले.