गोदावरी अर्बनच्या नेत्रदीपक यशाची सहकार भारतीने घेतली दखल
एम.डी.धनंजय तांबेकर यांचा नितीन गडकरींच्या हस्ते गौरव
----------------------------------------
नांदेड : गोदावरी अर्बनने राज्यासह इतर चार राज्यात अवघ्या आठ वर्षाच्या कालावधीत केलेल्या नेत्रदीपक प्रगतीची सहकार भारतीने दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचा गौरव करण्यात आला आहे.
सहकार भारती द्वारा आळंदी,
पुणे येथे ११ व्या त्रैवार्षिक अधिवेशन
आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,
माजी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे खासदार सुजय विखे पाटील,
रिझर्व्ह बँक संचालक सतिशजी मराठे,राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोदावरी अर्बनने अल्पावधीतच महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,तेलंगाणा,
कर्नाटक व गुजरात
या पाच राज्यात शाखा विस्तार केला आहे.
संस्थेच्या वतीने ग्राहकांना राष्ट्रीयकृत बॅंकेप्रमाणे सर्व सोयी सुविधा
उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
याचा फायदा त्यांना गेल्या दोन वर्षात देशात सगळीकडे कोरोनाची बिकट
परिस्थित अनेक मातबर संस्थाचा प्रगतीचा आलेख मंदावला असतांना देखिल
संस्थेने आपल्या ग्राहकांना घरपोच सेवा,मोबाईल बँकिंग,ऑनलाईन व्यवहार अशा
अपेक्षित सेवा देत प्रगतीचा
आलेख उंचावर नेला आहे.
संस्था आपले सर्वच व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या आदर्श निकषांचे पालन करीत पूर्ण करते त्यासोबतच विविध कायद्याचे अद्यावत
तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांना देऊन प्रशिक्षित केले जाते.
नुकताच गोदावरी अर्बनने चौदाशे
कोटींचा पल्ला गाठला आहे.
संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर हे सहकार क्षेत्रात गेली
२७ वर्षांपासून काम करीत आहेत.
त्यांनी आपल्या कार्याचा ठसा
सहकार क्षेत्रात उमटविला आहे.
या क्षेत्रात त्यांना आलेले खाचखळगे व त्यातून काढलेला मार्ग अनेक आहेत.
आपल्या या अनुभवाचा फायदा ते राज्यातील इतर असंख्य संस्थाना विविध विषयांवर सहकार तज्ञ म्हणून देत असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेत सहकार भारतीने त्यांचा गौरव केला आहे.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील अध्यक्ष राजश्री पाटील व समस्त संचालक मंडळांनी