Ticker

6/recent/ticker-posts

सारखणी येथे मोबाईल चोंरांच्या टोळीचा पर्दाफाश. मोबाईल चोरांना रंगेहाथ पकडले सिंदखेड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी


सारखणी येथे मोबाईल चोंरांच्या टोळीचा पर्दाफाश. 
मोबाईल चोरांना रंगेहाथ पकडले 


सिंदखेड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी.


श्रीक्ष्रेत्र माहूर/वि. प्र. पदमा गिऱ्हे

  माहूर शहरासह तालुक्यातील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना 

नित्याच्याच झाल्या असून मोबाईल चोरांनी उच्छाद मांडला आहे, माहूर तालुक्यातील सारखणी येथे

 आठवडी बाजारात दिनांक 25 आॅक्टोबर 2021 सोमवारी चार वाजताचे दरम्यान सलीम अजिजभाई फाजलानी 

यांचा मोबाईल चोरट्यांनी हातोहात
 लंपास केला

 याचवेळी देविदास दूधराम राठोडरा। मूंगसी हे भाजी। खरेदी करीत असतांना

 त्यांचाही मोबाईल चोरट्यांनी हातोहात पळविला दोनही मोबाईल आपल्या साथीदाराकडे देत 

असतांना त्याला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला उर्वरीत दोघे पळून जात असताना 

सिंदखेड पोलीसांनी त्यांना सिनेमा स्टाईलने पकडून त्यांचे विरोधात 

गुन्हा दाखल करून त्यांना माहूर 
न्यायालयात हजर केले 

असता न्यायालयाने त्यांची न्यालयीन कोठडी रवानगी केली सिंदखेड पोलीसांच्या

 धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले 
जात आहे.