Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर पंचायत समिती अंतर्गतच्या विविध विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध विकासात्मक कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला प्रमुख सतीश बोंतावार यांनी महामहिम राज्यपाल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे


किनवट तालुका प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर पंचायत समिती अंतर्गतच्या विविध विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध  विकासात्मक कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला असतानाही राज्य विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने 

त्यांच्या किनवट माहूर दौऱ्यात भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता क्लिनचीट दिल्यामुळे समितीच्या दौऱ्याची व दौऱ्यादरम्यान 

त्यांनी केलेल्या कार्यवाही संबंधाने उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा 

प्रमुख सतीश बोंतावार यांनी महामहिम राज्यपाल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे

निवेदनात नमूद केले की नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर हे दोन्ही तालुके आदिवासी दुर्गम व मागास तालुके म्हणून 

ओळखले जातात किनवट तालुक्यात 191 गावे असून 134 ग्रामपंचायत आहेत

 तर माहूर तालुक्यात 92 गावे असून 62 ग्रामपंचायती आहेत त्यापैकी 80 टक्के ग्रामपंचायती  पेसा योजनेत समावेश आहे

 तसेच 80 टक्के ग्रा प अनुसूचित क्षेत्रात आहेत त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनाद्वारे दरवर्षीच कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर होतो

 विशेष म्हणजे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गोकुंदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे 

या कार्यालयाचा वार्षिक अर्थसंकल्प अंदाजे दोनशे ऐंशी कोटी रुपयाच्या जवळपास आहे 

मात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे तसेच संगणमतामुळे विकास कामात लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होत असतो ग्रामसेवक तलाठी शिक्षक मंडळ अधिकारी विस्ताराधिकारी 

कनिष्ठ अभियंतावर्ग  मुख्यालय सोडून तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य करुन सेवा करतो  पिण्याचे पाणी, सार्वजनिक रस्ते, 

नाल्या इत्यादी पायाभूत सुविधांची बहुतांश कामे पाच पाच वर्षापासून अर्धवट आहेत 

तर बहुतेक कामे कागदोपत्री करून निधी हडप केल्याचे असंख्य प्रकरणे उघड होत असतात तालुक्यातील कित्येक गावांना जाण्यासाठी 

आजही रस्ता नाही उन्हाळ्याच्या दिवसात दरवर्षी खेड्यापाड्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते 

प्रत्येक विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी रेल्वेने नांदेडहून ये-जा करतात त्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाजाचा लाखो रुपयांचा निधी दरवर्षी परत जात असतो 

किनवट  माहूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील भ्रष्टाचारा विरोधात नागरिकांच्या शेकडो तक्रारी पंचायत समिती कडे दाखल होतात 

परंतु नागरिकांच्या तक्रारीवर थातूरमातूर चौकशी करून  अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभय देण्यात येतो 

ग्रामसेवक, तलाठी शिक्षक, मंडळाधिकारी,विस्तार अधिकारी अभियंते हेअशिक्षित अज्ञानी सरपंचांचा गैरफायदा घेत

 गावविकास कामांच्या निधीत संगनमताने भ्रष्टाचार करून शासनाची तसेच ग्रामस्थांची दिशाभूल करतात  केंद्र व राज्य सरकारच्या या  विकासात्मक योजनेच्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग होतो किंवा नाही 
याची चौकशी करण्याकामी राज्य विधिमंडळाच्या पंचायत समितीने दिनांक 3 सप्टेंबर 2019 रोजी किनवट माहूर तालुक्याचा दौरा केला समितीचा दौरा येणार ऐकून

 दिनांक 3 सप्टेंबर रोजी दिवसभर तालुक्यातील अनेक गावातील शेकडो नागरिक तक्रारी व निवेदन घेऊन पंचायत समिती कार्यालयाजवळ ताटकळत राहिले 

सायंकाळी  सहा वाजेपर्यंत प्रतिक्षा  करून  नागरिक आपल्या गावी परतले  नागरिक गावी परतल्यानंतर समितीचे सदस्य पंचायत समिती कार्यालयात  दाखल झाले

 त्यानंतर नागरिकांना पंचायत समिती कार्यालयात प्रवेश न देता बंद खोलीत लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी कर्मचार्‍यांशी चर्चा करून अवघ्या तासभराच्या कालावधीतच समिती परत गेली दौऱ्यादरम्यान 

त्यांनी एकाही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्या दौऱ्यावर व दौऱ्यातील कामकाजावर शंका उपस्थित होत आहे त्यामुळे या दौऱ्याची व दौऱ्या दरम्यान त्यांनी केलेल्या कार्यवाहीची विशेष गोपनीय चौकशी करावी 

अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सतीश बोंतावार यांनी महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे