Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी— गोकुंदा येथिल शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील धान्यात सरळ दगडीगिट्टी मिश्रीत धान्याचे वाटप चालू आहे. पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिधापत्रिकाधारकांना दगडमिश्रीत धान्य घ्यावे लागत आहे


किनवट/प्रतिनिधी— गोकुंदा येथिल  शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातील धान्यात सरळ दगडीगिट्टी मिश्रीत धान्याचे वाटप चालू आहे. पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिधापत्रिकाधारकांना दगडमिश्रीत धान्य घ्यावे लागत आहे.

 गोकुंद्यासारख्या गावात हा प्रकार असेल तर खेडेगावात कसे धान्य वितरीत होत असेल ? 

अशा विघातक धान्य प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
        

  गोकुंदा येथिल शासनमान्य स्वस्त धान्य दुकान क्र.१५० मध्ये माहे आॅक्टोबरचे धान्य वितरण चालू आहे. 

 १२ आॅक्टोबर रोजी वाटप झालेल्या धान्यात दगडगिट्टी मिश्रीत असल्याचे दिसून आले. 

शिधापत्रिकाधारकांनी धान्यतोल करणार्‍यांना विचारले असता ते म्हणाले की, हे धान्य पुरवठा विभागाला बदलून देण्याची मागणी केली

 परंतु प्रशासनाने ते धान्य परत घेण्यास इन्कार केल्याचे सांगितले.
        

 दगडमिश्रीत धान्याप्रकरणी पुरवठा विभागाशी संपर्क करुन  खातरजमा करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झालेला नाही. 

गोकुंदा हे गाव किनवट शहराला लागूनच असतांना जर असे धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जात असेल तर 

तालुक्यातील अतिदुर्गम खेडी गावात पुरवठा विभाग कसले धान्य पुरवठा करीत असेल ? यावर यावरुन शंकांना वाव मिळतो.

 गोकुंद्यातील दुकान हे पर्यायी तत्वावर बाहेरच्या दुकानचालकाला जोडलेले आहे. 

त्या दुकानचालकाने वाटपासाठी तिसर्‍याला दिलेले असल्याचे धक्कादायक ऐकायला मिळाले. 

गरीब शिधापत्रिकाधारकांनी याची न्यायासाठी केफियत मांडायची कोणाकडे ? असा सवाल आहे.

 तडफदार तहसिलदार डाॅ.मृणाल जाधव आणि सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी असे भेसळ धान्य जप्त करुन तात्काळ चौकशी करावी.

 हा प्रकार कुठून घडला तिथपर्यंत पोहोचून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.