किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुंदा जिल्हा परिषद मतदार संघ लोकांच्या आग्रहास्तव लढवणार असल्याचा
भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सतीशभाऊ नेमान्नीवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून वाडी तांड्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी दिवसाची रात्र करून
त्यांनी अथक परिश्रम घेऊन भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन आणण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अहोरात्र झटून लोकनेते आमदार भीमराव केराम
यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावली. यासह किनवट नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असताना
सुद्धा नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभागा प्रभागांमध्ये घरोघरी प्रचार करून
भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी परिश्रम घेतले हे विशेष.
दरम्यान भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सतीश भाऊ नेमानीवार हे मांडवा
येथील रहिवासी असल्यामुळे मांडवा, नागझरी, वंजारवाडी, हटखोरी, मलकापूर, खेर्डा कंमठाला,
गोकुंदा यासह आदी गावांमध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे
व गोरगरीब जनतेच्या सुखा-दुखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्वश्रुत आहे.
त्यामुळे लोकप्रिय लोकनेते आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या आग्रहास्तव गोकुंदा
जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचा आत्मविश्वास
भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सतीशभाऊ नेमामावार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.