उपेक्षित वर्ग लढा तर्फे गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी वानोळा गटातून निवडणूक लढवावी !
वानोळा जि.प. गटातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी व युवकांचा आग्रह !
माहूर- माहूर तालुक्यात शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असलेले गोर सेना या सामाजिक संघटनेचे
माहूर तालुका अध्यक्ष प्रफुल जाधव यांनी वानोळा जि.प. गटात उमेदवारी दाखल केल्यास
त्यांना जि.प. मध्ये प्रतिनिधीत्व करण्यास पाठविण्याचा संकल्प करून प्रफुल जाधव यांनी उपेक्षित वर्ग लढा तर्फे निवडणूक लढवावी
असा आग्रह वानोळा जि.प. गटातील अनेक शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरीकातून होत आहे.
सन २००९ पासून गोरसिकवाडी चळवळीत समाजकार्य करून
२०१३ मध्ये गोर सेना या सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून प्रफुल जाधव
यांची माहूर तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व सामान्य नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असलेला
सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर परीचीत असल्याने आपला लोकप्रतिनिधी असा असावा ही भावना
माहूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकात जोमाने फोफावत आहे.
याचीच परिणीती म्हणून काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या
जि.प.पं.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने तालुक्यातील
अनेक गावात चावडी,पारावर, चहा टपरीवर त्यांच्या आंदोलनाचे
किस्से चर्चेला येत आहेत.
प्रफुल जाधव यांनी माहूर तालुक्यात केलेल्या विविध आंदोलनातील शेतकरी कर्जमाफीबाबत पाठपुरावा, कर्ज पुनर्गठन, प्रतिवर्षी शेतकरी पिक विमा,
पिक कर्जापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून वेळोवेळी केलेली आंदोलने,
नैसर्गिक आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत,
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समस्या व अडचणी सोडविण्यासाठी केलेली आंदोलने तसेच लसनवाडी
येथील पाणी पुरवठा योजनेत झालेल्या भष्ट्राचार संदर्भात केलेले चक्का जाम आंदोलन माहूर येथील
स्व.वसंतराव नाईक स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याच्या मागणीचे तथाकथित आंदोलन,
कन्ट्रकशन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बळी गेलेल्या बालकाच्या कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी केलेला
पाठपुरावा आदी बाबीची चर्चा होत असल्याने जनतेत त्यांच्याबाबत आदराचे स्थान निर्माण होत आहे.
त्यामुळे माहूर तालुक्यात परंपरागत राजकीय वर्चस्व गाजविणाऱ्या काही पुढाऱ्यांनी
आयत्यावेळी आंदोलनात येऊन श्रेय घेण्यासाठी केलेल्या धडपडी पाहता कुठल्याही पदावर नसतांना
केवळ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून माहूर तालुक्यातील अनेक गंभीर विषय व्यवस्थितपणे हाताळले असल्याने
वानोळा जि.प. गटासह संपूर्ण माहूर तालुक्यात प्रफुल जाधव यांचा प्रभाव वाढला आहे.
वानोळा जि.प. गट हा बंजारा समजाचे प्राबल्य असलेला गट असून प्रफुल जाधव यांचे बंजारा समाजासह
सर्व जातीसमुहात वैचारिक मित्रमंडळ जमविले आहे.
त्यामुळे वानोळा जि.प. गटातील
अनेक गावे, वाड्या, तांडे,
गुडयातील विविध समाजघटकातील नागरिकांमधून