Ticker

6/recent/ticker-posts

गैरव्यवहार वनविभागाचा !!!चौकशी आदेश मात्र तक्रारदारांची !!! चौकशी अधिकाऱ्याचा उफराटा कारभार. बोधडी शिवसेना सर्कल प्रमुख साईनाथ रुद्रावार यांचे तक्रारी अर्जाचे चौकशी प्रकरण


गैरव्यवहार वनविभागाचा !!!चौकशी आदेश मात्र तक्रारदारांची !!! चौकशी अधिकाऱ्याचा उफराटा कारभार. बोधडी शिवसेना सर्कल प्रमुख साईनाथ रुद्रावार यांचे तक्रारी अर्जाचे चौकशी प्रकरण

किनवट शहर प्रतिनिधी राज माहुरकर

किनवट तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला

 असल्याची तक्रार शिवसेना सर्कल प्रमुख साईनाथ रुद्रवर व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग अल्कटवार यांनी एका निवेदनाद्वारे केली

 त्यानुसार उपवनसंरक्षक नांदेड यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी एक पत्र काढून 2020 ते 2021 पर्यंत झालेल्या सर्व कामाची समितीमार्फत चौकशी करण्याचे 

आदेश सहायक उपवनसंरक्षक यांना देऊनही त्यांनी आज पर्यंत जाय मोक्यावर जाऊन चौकशी करण्याऐवजी तक्रार करत्यांनाच तुम्ही सर्व पुरावे घेऊन नांदेडला 

या म्हणून 2 पत्र पाठविले परंतु तक्रार कर्त्यांची  म्हणणे आहे की जंगलात झालेली कामे आम्ही काय डोक्यावर घेऊन नांदेडला जावे कि काय असा प्रश्न उपस्थित करीत आहेत 

यासंदर्भात सदर प्रतिनिधीने सहाय्यक वनसंरक्षक लखमावर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला 

असता त्यांनी सांगितले की चौकशी करण्याआधी तक्रार कर्त्याने पुरावे सादर करण्याची शासनची जीआर आहे 
असे सांगितले जर तक्रारदाराने ठोस पुरावे सादर केले नाहीत तर तक्रार निकाली काढणार असल्याचे सांगितले चौकशी अधिकाऱ्यांच्या

 या भूमिकेमुळे चौकशी अधिकारी झालेला गैरव्यवहार दाबून टाकण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत  

तक्रारदाराची मागणी सर्व कामाची चौकशी ही जाय मोक्यावर झाली पाहिजे 
मागणी दि 26 ऑक्टोंबर रोजी

 उपवनसंरक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आला 

असून जर योग्य निपक्षपाती चौकशी न झाल्यास आपल्या कार्यालयाकडे उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे