Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर-बिलोली मध्ये भाजपाचे सुभाष साबणेंचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार- सुमित राठोडमहाविकास आघाडीवर जनता नाराज असल्याने पंढरपूरची पुनरावृत्ती होणारच


देगलूर-बिलोली मध्ये भाजपाचे सुभाष साबणेंचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार- सुमित राठोड

महाविकास आघाडीवर जनता नाराज असल्याने पंढरपूरची पुनरावृत्ती होणारच! 

तालुका प्रतिनिधी

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

यामध्ये महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे. 

नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी  

30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ३० ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या 

पोटनिवडणूकीसाठी  भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 व जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण भाजपा,

 विविध आघाडीचे पदाधिकारी देगलूर-बिलोली मध्ये तळ ठोकून असल्याने भाजपा चे उमेदवार सुभाष साबणेंना अधिक बळकट मिळत आहे 

तसेच माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा या निवडणुकीकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. 

भारतीय जनता पक्ष पंढरपूरच्या विजयाची पुनरावृत्ती करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दोन दिवसीय प्राचार दौऱ्यात म्हटले आहे. 


चंद्रकांत पाटील हे देगलूर-बिलोली मध्ये झंझावाती दौऱ्यात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांच्या समवेत नांदेड जिल्ह्यातील 

भाजपाचे जवळपास सर्वच पदाधिकारी जोमाने कार्यास लागल्याने सुभाष साबनेंच्या रूपाने भाजपाला १०७ वा आमदार मिळणार 

असल्याची प्रतिक्रिया ३ दिवसांचा देगलूर-बिलोली मतदारसंघात प्रचार दौरा करून आल्यावर

 भाजपा नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड यांनी आमच्या माहुर प्रतिनिधी जवळ दिली. 

देगलूर-बिलोली मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्याने भाजपा तर्फे मागील तीन वेळा

 या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले शिवसेनेतील नाराज नेते माजी आमदार सुभाष साबणे 

तर कॉंग्रेस कडून स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे 

परंतू ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तमराव इंगोले या उमद्या नेत्यास उमेदवारी जाहीर करून 

आखाड्यात उडी घेतल्याने वंचित ने भाजपा आणि कॉंग्रेस समोर एक तगडे आव्हान उभे केले आहे 

व हि निवडणूक तिरंगीच होणार असे चित्र सध्या संपूर्ण मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.

भाजपा आणि कॉंग्रेस पेक्षा सध्यातरी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी-खेडोपाडी घराघरात जाऊन प्रचार करीत असल्याने 

जनता जनार्दन कोणाच्या गळ्यात विजयाची माळा टाकेल याचे चित्र ३ नोव्हेंबर रोजी मतदान मोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

 किनवट-माहुर मतदार संघातून आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली अध्यात्मिक 

आघाडीचे जिल्हा संयोजक शाम भारती महाराज, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे, 

जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेमानीवार हे सुद्धा प्रचारासाठी प्राण झोकून सुभाष साबणेंचा आपापल्या परीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.