Ticker

6/recent/ticker-posts

"आजादी का अमृत महोत्सव" कार्यक्रमा अंतर्गत वानोळा येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न


"आजादी का अमृत महोत्सव" कार्यक्रमा अंतर्गत वानोळा येथे मार्गदर्शन शिबिर संपन्न

अजय चव्हाण दै.चालू वार्ता वानोळा प्रतिनिधी 

   दि.02 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त माहूर तालुका विधी सेवा 

समिती, माहूर पंचायत समिती, व ग्रामपंचायत कार्यालय वानोळा
 यांच्या संयुक्त विद्यमाने"

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वानोळा येथे कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आला.
  

 यावेळी माहूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री. पवन तापडिया, गटविकास अधिकारी मेहेत्रे,वकील संघाचे सर्व पदाधिकारी, 

सपोनि. अण्णासाहेब पवार, सपोनि.संजय पवार,सरपंच रविकुमार मेंडके,

ग्रामविकास अधिकारी श्री. देवकांबळे,उपसरपंच सुरेश राठोड,तारासिंग चव्हाण, मा. प्रा. वाय. एच.जाधव,

प्रा. माने,प्रा. चारोडे, प्रा.विजय राठोड,पत्रकार पंडित धूप्पे, जयसिंग चव्हाण, धावू आडे, सवाई राठोड,वासुदेव राठोड,

पत्रकार नितेश बनसोडे, मा. उपसरपंच अभिजित राठोड, युवा नेते अजयराजे चव्हाण, कृष्णा राठोड यांची उपस्थिती होती.
   

 यावेळी विधी सेवा समितीच्या वतीने ॲड. राठोड,ॲड.कपाटे,ॲड. भवरे,ॲड. ढगे यांनी मार्गदर्शन केले.
      

सूत्र संचालन अभिजित राठोड प्रस्तावना ॲड. दिनेश येवूतकर,तर आभार प्रदर्शन सरपंच डॉ. रविकुमार मेंडके यांनी केले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला व. ना वि. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली.
    

कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषण मा. न्या.तापडिया यांनी केले, 

या कार्यक्रमात संविधान,कायदा, ज्येष्ठ नागरिक व त्यांचे अधिकार,महिलांचे पोटगी विषयक अधिकार,

शिक्षणाचा अधिकार, लोक न्यायालय v मध्यस्थी चे अधिकार, शासनाच्या विविध योजना 

यांची माहिती देण्यात आली,यावेळी गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती,

कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छता विषयक शपथ घेण्यात आली.
   कायद्याच्या वापर जनतेने योग्य प्रकारे करावा, वयक्तिक स्वार्थासाठी करू नये, 

कायदा हे एक शस्त्र आहे,त्याचा 
जपून वापर करा,
त्याच्या गैरवापर करू नका, 

आपले हक्क,अधिकार यासाठी कायद्याचा योग्य वापर करावा, असे न्या. तापडिया म्हणाले.
    
यावेळी व. ना. वि. महाविद्यालयाचे 
शिक्षक, जि. प.चे शिक्षक, 

ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व कर्मचारी,गावकरी  यांनी सहकार्य केले.