सापडलेला मोबाईल परत करणाऱ्या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचं होताहे सर्वत्र कौतुक
किनवट : सकाळी शाळेत जात असताना किनवट ते माहूर मार्गावर एक महागडा अँड्रॉइड मोबाईल फोन सापडला. सदर फोनवरील कॉल रेकॉर्ड वरून संबंधितास
शाळेत बोलावून मोबाईल संच परत करणाऱ्या शिक्षकांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धार्थनगर, गोकुंदा येथील रहिवाशी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
रोहीदास तांडा येथील शिक्षक प्रशांत शेरे हे नेहमीसाखे सकाळीच शाळेकडे निघाले.
किनवट ते माहूर मार्गावरून शाळेकडे जातांना रस्त्यात त्यांना एक अँड्राईड मोबाईल संच पडून असलेला दिसला.
त्यांनी त्यास जवळ घेतले. कोणतेही लॉकपॅटर्न नसल्याने त्यांनी त्यावरील कॉल डिटेल चेक केले.
तेव्हा हा हँडसेट प्रदीप प्रकाश राठोड रा.सारखणी यांचा असल्याचे त्यांना समजले.
किमती मोबाईल हरविल्याच्या विवषतेत असलेल्या मोबाईल धारकाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सांगितले की,
आपला मोबाईल फोन आम्हाला रस्त्यात सापडला असून तो सुरक्षित आहे,
आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिदास तांडा येथे येऊन तो घेऊन जावा.
काही वेळाने ते आले.
त्यानंतर शिक्षकांनी त्यांना मोबाईल दिला.
त्यांच्या हाती तो महागडा फोन मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
आजच्या धाकधुकीच्या काळात इमानदारी आजही जिवंत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यांचे मनातून आभार मानले.
तंत्रस्नेही शिक्षक प्रशांत शेरे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा बडगिरे,
केंद्र प्रमुख शिवाजी खुडे, केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर,
इब्टाचे जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम कानिंदे,