Ticker

6/recent/ticker-posts

पटीयाला ( पंजाब) येथुन NIS बॉक्सिंग राष्ट्रीय दर्जाचा कोर्स पूर्ण करून आल्या बद्दल संदीप यशीमोड यांचा उपविभागिय अधिकरी पुजार यांनी केला सत्कार


पटीयाला ( पंजाब) येथुन NIS बॉक्सिंग राष्ट्रीय दर्जाचा कोर्स पूर्ण करून आल्या बद्दल संदीप यशीमोड यांचा उपविभागिय अधिकरी पुजार यांनी केला सत्कार

किनवट :-
तालुका क्रिडा संयोजक तथा क्रीडा शिक्षक  संदीप  प्रल्हाद यशीमोड सर यांनी आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले व किनवट तालुक्यात एक आदर्श निर्माण केला 

त्यांच्या मुळे अनेक विद्यार्थी क्रिडा क्षेत्राकडे आकर्षित झाले त्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा त्यांनी रोवला क्रीडा च माहेर घर जाणलं जाणार 

पटीयाला पंजाब जिथे अनेक राष्ट्रीय क्रिडापटु प्रशिक्षण घेतात व सुर्वण पदक मिळवून 

भारताच नाव लौकिक करतात अशा ठिकाणी संदीप येशीमोड सर  यांनी जाऊन NIS कोर्स राष्टीय दर्जाचा पूर्ण केला

 त्यामुळे आता किनवट सारख्या आदिवासी अतीदुर्गम भागास कराटे 

सोबतच बॉक्सिंग क्रिडा प्रकार 
राष्ट्रीय दर्जाच प्रशिक्षण मिळणार आहे 

हि  एक किनवट तालुक्यासाठी 
गर्वाची बाब आहे. 
त्यांनी NIS कोर्स पूर्ण केल्या बद्दल

 सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागिय अधिकारी श्री  किर्ती किरण पुजार साहेब IAS  हस्ते त्यांच पुष्पगुच्छ ,

 प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आल या वेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक  श्री कराड सर, गणराज गायकवाड सर,

 सोनटक्के सर, राहुल अपसमवाड सर, फरहान सर, देशमुखे मॅडम, शिंदे सर, परीवाले सर, 

नरवाडे सर, तथा किनवट शासकिम आश्रम शाळेचे अधिक्षक पुरी सर, व सर्व क्रिडा शिक्षक या वेळी उपस्थित होते