Ticker

6/recent/ticker-posts

मांडवी, दि.12 ( वार्ताहर) - तब्बल 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दहेली येथील शाखा पोस्ट मास्तर सुदर्शन शिरगुलवार हे सेवानिवृत्त होत असून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे गौरव उदगार मैल ओव्हरसेल आर.एस.भालेराव यांनी अध्यक्षस्थानावरून काढले


मांडवी, दि.12  ( वार्ताहर) -  तब्बल 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दहेली येथील शाखा पोस्ट मास्तर सुदर्शन शिरगुलवार हे सेवानिवृत्त होत असून त्यांनी केलेल्या 

उत्कृष्ट कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे गौरव उदगार मैल ओव्हरसेल आर.एस.भालेराव यांनी अध्यक्षस्थानावरून काढले.
 
       
आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मांडवी कार्यकक्षेत येणाऱ्या दहेली गावचे शाखा पोस्ट मास्तर सुदर्शन शिरूरवार 

यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा अध्यक्षस्थानावरून 

श्री भालेराव हे बोलत होते. कार्यक्रमास मांडवी उप डाक घराचे पोस्ट मास्तर श्री सुरेश काळे यांनीही मार्गदर्शन केले.

     या वेळी सुदर्शन शिरगुरुवार यांचे हार, शाल व श्रीफळ देऊन 

दामोदर दगडपेल्लीवार यांनी तर नरसय्या पडकंटवार  यांनी कपड्याचा 

आहेर देऊन तसेच मांडवी उपविभागाकडून विद्युत शेगडी भेट देऊन सन्मान करण्यात आला.

 अध्यक्ष श्री भालेराव यांचे पोस्टमास्तर कैलास पाटील 

यांनी तर श्री काळे यांचे कोठारी चे पोस्टमास्तर रामराव जाधव यांनी हार, 
शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.आर .कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन

 स्वामी बासरवार यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन रमेश दासरवार यांनी केले होते.

 यावेळी मांडवी उपविभागातील  पोष्ट मास्‍तर सर्व श्री धर्मेंद्र ठाकूर,

 संतोष नदीकोंडावार ,दादाराव मोहुर्ले, 
लखन राठोड,

 करण चव्हाण ,सचिन पेन्दोर उपेंद्र मोटेम, दिनेश बासरवार, राहुल भुरे, रवी दासरवार, 

आत्माराम कोटरंगे व सौ.नयना राठोड आणी सौ.जयश्री वाडगुरे  इत्यादींची उपस्थिती होती.