Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत मांडवा चे कौतूक ! !! नांदेड जिल्हा परिषद च्या सी . ई . ओ . मॅडम सौ . वर्षाताई ठाकूर / घुगे मॅडम दि .12/11/2021 शुक्रवार रोजी ग्रा.पं. मांडवा ता . किनवट . जि . नांदेड ला भेट दिली


🌹 ग्रामपंचायत मांडवा चे कौतूक ! !!  नांदेड जिल्हा परिषद च्या सी . ई . ओ .  मॅडम सौ . वर्षाताई ठाकूर / घुगे मॅडम दि .12/11/2021 शुक्रवार रोजी ग्रा.पं. मांडवा ता . किनवट . जि . नांदेड ला भेट दिली . 

मांडवा ग्रा.पं अंतर्गत गावातील चालणारी मोफत पिठाची गिरणी, 

व्यायाम शाळा, कोलाम वस्तीतील चौदा (14) घराचे बांधकाम पूर्ण झालेले,

 तसेच सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, जि.प. के . प्रा . शा . मांडवा इत्यादी ठिकाणी 
मा . सि. ई . ओ . मॅडम यांनी भेट दिली .

 मा . ठाकूर मॅडम यांनी मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत चालणाऱ्या विविध

  शासकीय कामाकडे पाहून समाधान 
व्यक्त केले . 

व ग्रामपंचायत मांडवा टिमचे कौतूक केले . 
ह्यावेळी उपसरपंच श्रीमती पुष्पा किशनराव इरपनवार 

ह्यांचे सुपुत्र श्री नरसिंग
 किशनराव इरपनवार सर (शिक्षक) 

हे ग्रा.पं. कामात सढळ हाताने मदत करतात असे कोलाम वस्तीतील लोकानी मा . ठाकूर मॅडम 

यांना सांगितले तेव्हा ठाकूर मॅडम यांनी नरसिंग इरपनवार सर यांचे तोंडभरून कौतुक केले .

 सरपंच व नरसिंग सर यांनी मा . सी.ई.ओ. वर्षाताई ठाकूर / घुगे मॅडम ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .

 धन्यवाद ! -- आदरणीय सी . ई . ओ . वर्षाताई ठाकूर / घुगे मॅडम