अब तक 47 गिरफ्तार :विजय कबाडे
शहरात फिक्स पॉईट,पेट्रोलिंगमध्ये वाढ तर २९ फरारांचा शोध सुरु
नांदेड : खतीब अब्दुल सोहेल
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर दगडफेकीची घडली होती.
याप्रकरणात गेल्या चारपाच आरोपीची धरपकड सुरु आहे.
पर्यंत पोलिस विभागाने ४७ जणांना
अटक केली असून
२९ फरार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय कवाडे यांनी देत असतांना 'अब तक ४७ '
असे सांगत उर्वरित २९ फरार असून शोध मोहिम चालू असल्याची माहिती 'एकमत'शी बोलताना दिली.
रझा अकादमीच्या वतीने हे अंदोलन करण्यात आले होते.
या अंदोलन दरम्यान अनेकांनी
चिथावणीखोर भाषणे दिली होती.
सि.सी.टीव्ही फुटेज व किडीओच्या माध्यमातून अनेकांची ओळख पटली आहे. त्यांची शोध मोहिम सुरू आहे.
यावेव्यै यातील काही समाज कंटकांनी शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत,
कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकानांची नासपुसकरुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. एक पोलिस निरीक्षक व हवलदार जखमी झाले आहेत.
यांच्यावर हल्ला करणान्यांचा शोध घेत असताना काहीजण भुमीगत झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत.
शहरात वेगवेगळ्या पोलिस स्टेशन अंतर्गत फिक्स पॉईट पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.
या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर देखील पोलिस विभाग लक्ष ठेवून आहे.
शहराची शांतता बिघडवणाऱ्या समाज कंटकाला यापूर्वी देखील पोलिस विभागाने चांगलाच चौप दिला आहे.
एक वर्षापूर्वी असाच काही प्रकार एका समानाअंतर्गत घडला होता.
त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला होत यावेळी देखील पोलिसांनी संयम बाळगळला होता.
कायदा आणि सुव्यवस्था शांत रहा यासाठी त्या समाजातील सर्वांनाचा विनंतीपुर्वक समजविण्यात आले होते.
परंतु त्यांनी नियमां उल्लंघन केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांवर हा देखील केल होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्या आले.
ते आजतागायत काही फरार आहेत तर काहींची अटक होवून सुटका झाली आहे
असाच काही प्रकार यातील फरार संशयी करत असल्याचे पहावयास मिळाले आहे.
परंत त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांची अटक अटळ आहे.
त्यांनी स्वतःहून पोलिसाजवळ शरणागती स्विकारल्यास त्यांच्यावर कुठलीह कडक कारवाई करण्यात येणार नाही.