Ticker

6/recent/ticker-posts

विविध मागण्यासाठी ओबीसीचा आ.केराम यांच्या घरावर मोर्चा धडकणार जास्तीत जास्त ओबीसी बांधवानी मोर्चात सहभागी व्हावेगोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांचे आवाहन


विविध मागण्यासाठी ओबीसीचा आ.केराम यांच्या घरावर मोर्चा धडकणार 


जास्तीत जास्त ओबीसी बांधवानी मोर्चात सहभागी व्हावे
गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांचे आवाहन


माहूर- ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा व ओबीसीच्या

 विविध समस्या सोडविण्याच्या मागणी साठी गोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण 

यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राज्यभर  खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी 

यांच्या घरावर दि.१५ रोजी ओबीसीच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून दि.१५ रोजी दुपारी १२ वाजता

 किनवट,माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव केराम यांच्या किनवट येथील निवासस्थानी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  

या मोर्चाच्या मागण्या मध्ये ओबीसी  नागरीकांच्या

 इतर मागास प्रवर्गातील जनतेच्या आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी  प्रवर्गातील नागरीकांची जाती निहाय जनगणना करण्यात यावी,

 ओबीसी प्रवर्गातील नागरीकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणामध्ये वाटा देण्यात यावे. मंडल आयोगाच्या 

शिफारशीनुसार २७% आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी व भटक्या विमुक्त समुदयाचे पदोन्नतीतील 

आरक्षण कायम करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांचे साकडे आंदोलन कर्ते करणार असून 

लोकशाही पध्दतीने आंदोलन करून निषेध नोंदविणार आहेत. तेव्हा किनवट माहूर तालुक्यातील

 सर्व  ओबीसी बांधवांनी या आंदोलनास सहभाग घ्यावा असे आवाहन गोर सेना माहूर तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी केले आहे.