किनवट/प्रतिनिधी— वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या राज्य स्तरीय परिषदेचा दहावा वर्धापन सोहळा ११ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.
किनवट तालुका शाखेच्या पदाधिकार्यांची निवड केलेल्यांचा
यावेळी नियुक्तीपत्र देऊन श्याम भारती यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य स्तरीय वारकरी साहित्य परिषदेचा दहावा वर्धापन राज्यभर पार पडला.
त्याचेच औचित्य साधून किनवट तालुका शाखेनेही वर्धापन दिनाचे आयोजन केले होते.
किनवट येथिल गजानन महाराज मंदीर सभागृहात कार्यक्रम पार पडला.
व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन
सांप्रदायाच्या नियमावलीनुसार भजनाने सुरुवात करण्यात आली.
माहूर येथिल श्याम भारती हे
अध्यक्षस्थानी होते.
त्यांच्या हस्ते नवनिर्वाचितांना नियुक्तीपत्र प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक व सूत्रसंचालन तालुका सचिव रघूनाथ कराड यांनी केले.
पसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी प्रमूख
बी.एल.कागणे यांनी कळविले आहे.
यावेळी केशव कराड, परसराम कागणे,
नरसींग महाराज वाघमारे, श्रीनिवास फड, राजु लहाने, केशव केंद्रे,
दिगांबर सुं. मुंडे, मारोती जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यवृंद उपस्थित होते.