पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे.
एक अध्याय काळाच्या पडद्याआड
गेला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे
यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले,
इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान,
‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा
त्यांनी प्रयत्न केला. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!
#BabasahebPurandare