शौर्यवीर साबळेंचा जिल्ह्याला अभिमान : भाई प्रदीप अंभोरे
वीर जवान साबळेंचे उदयनगरकरांनी केले जंगी स्वागत
उंद्रि ( प्र। ति.) : भारतीय सीमेवर कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पुलिस दलाच्या वीर तीजवानाने एका दहशतवाद्याला ठार करीत दुसरा पळून जात असतांना पाठलाग करून
कंठस्नान घालणाऱ्या उंद्रीच्या त्या सुपूत्र वीर जवानाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उंद्री येथे जंगी स्वागत केले. यावेळी उंद्रीचे सरपंच भाई प्रदीप अंभोरे,
यांचे प्रमुख मार्गदर्शनात नग रातून महापुरुष पुतल्यान्ना वीर जवान हस्ते माल्यार्पण करून प्रचंड जल्लोषत
सर्व जाती धर्माचे युवक पुरुष महिलानी वीर जवान रैली काढूं न जोरदार स्वागत केले बस स्टैण्ड उंद्री येथी ल सभेत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर,
राम डहाके मनोज लहु डकर रमेश पाटिल बब्बू भाई रफीक भाई रफीक शेख असलम भाई बिस्मिल्ला भाई हारून भाई मुकेश भंडारे सोराब सैयद यांच्यासह परिसरसह गांवकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तालुक्यातील उंद्री गावातील ज्ञानेश्वर श्रीराम साबळे सन २००५ मध्ये सैन्यात भरती झाले होते.
त्यांनी छत्तीसगड राज्यातील सुकमा, आसाम राज्यात सेवा दिल्यानंतर जम्मु व काश्मीर भागात बारामुल्ला परिसरात २०१६ मध्ये नियुक्ती झाली होती.
त्यांनी वीरता आणि धैयर्ता दाखवित जम्मु व काश्मीर राज्यातील बारामुल्ला ठाण्याअंतर्गत कलहर येथे १९ ऑक्टोबर २०१८ ला श्रीनगर ते बारामुल्ला नाक्यावर कर्तव्य बजावीत होते.
यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली असता अचानक गोळीबार सुरू झाला.
यावेळी श्री.साबळे यांनी समयसूचकता दाखवीत एका दहशतवाद्याला ठार केले तर दुसरा पळून जात असतांना पाठलाग करीत कंठस्नान घातले.
दोन्ही दहशतवाद्यांचा जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेसोबत संबंध असल्याचे
नंतर सिद्ध होऊन ते धोकदायक होते. त्यांच्या या कार्याचा गौरव ता.२२ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले असून
आज ता.२४ रोजी ते आपल्या गावी उंद्री येथे असता चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे
जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी त्यांची जंगी स्वागत केले तसेच गावामध्ये त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गावातील सर्व महामानवांना वंदन करून जवान ज्ञानेश्वर साबळे यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांचेसमवेत सरपंच भाई प्रदीप अंभोरे व बहुसंख्य नागरिकांसह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान सुपेकर, युवक काँग्रेसचे राम डहाके, यांचेसह सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होते.