गोकुंदा जि.प.गटात पत्रकार आनंद भालेराव ताकतीने निवडणूक लढविणार!
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका अवघ्या कहीं महिन्यावर येऊन ठेपल्याने किनवट व माहूर विधानसभा मतदारसंघात
जिल्हा परिषद पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल याची उत्सुकता आतापासूनच मतदारांमध्ये लागली आहे.
गोकुंदा जि. प. गट कोणत्या प्रवर्गासाठी सुटणार यावर सर्वांचे उमेदवारी अवलंबून असली तरी
आजच्या घडीला सर्वच प्रवर्गातील इच्छुक हा मतदारसंघ आपल्या प्रवर्गाला सुटणार आहे.
याचे आंदज बांधून मतदारांची चाचपणी करीत निवडणुकीची वाट पाहत आहेत.
जेंव्हा पासून आरक्षण सोडतीला प्रारंभ झाला तेव्हा पासून
आज पर्यंत अनुसूचित जाती साठी किनवट माहूर मतदार संघात जि.प.गट राखीव झाला नाही.
त्यामुळे या निवडणुकीत कमीत कमी 3 ते 4 जि. प.गट अनुसूचित जाती साठी
आरक्षित होतील असा कयास
बांधला जात आहे.
गोकुंदा जि प.गटात अनुसूचित जाती ची लक्षणीय संख्या पाहाता हा गट या प्रवर्गासाठी राखीव होईल
असा अंदाज जाणकारांकडून
वर्तविण्यात येत आहे.
आरक्षण सोडतीला वेळ आहे आरक्षण कोणते पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
परंतु सर्वच प्रवर्गातील उमेदवार हे आपले घोडे समोर दामटतांना दिसून येत आहेत.
एकूणच सध्या कोरोना काळ जरी असला तरी निवडणुकीची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे.
निवडणूका पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे सध्या तरी निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.