Ticker

6/recent/ticker-posts

किनवट दि. (तालुका प्रतिनिधी): सेटट्राइब च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी मिळाली असून आदिवासी दुर्गम किनवट तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ह्या


किनवट दि. (तालुका प्रतिनिधी): सेटट्राइब च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी मिळाली असून आदिवासी दुर्गम किनवट तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ह्या 

संधिचा उपयोग करून घेतल्यास आयटी क्षेत्रातील नौकरीचे व रोजगाराचे ध्येय आपले विद्यार्थी सहज साध्य करू शकतील.

 पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड ह्यासारख्या शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी किनवटमधील प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑनलाइन 

माध्यमातून माहिती तंत्रज्ञान अवगत करून घेत आहेत ही किनवटसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कीर्ति किरण पुजार ह्यांनी केले. 

संविधान दिनाचे औचित्य साधून सेटट्राइब व विवेक विचार मंच किनवट तर्फे 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करण्यात आला तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सेटट्राइब आयटी सोल्युशन्स ह्या किनवटस्थित 

आयटी कंपनीला यशस्वी दोन वर्ष पुर्ण झाल्याबद्दल व संविधान दिनानिमित्त सेटट्राइब तर्फे आयोजित “वन डे ऑन फ्लोअर” ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सेटट्राइब संस्था किनवटचा गौरव असून लवकरच ही संस्था तंत्रज्ञान व शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठेल असा विश्वास किनवट शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ह्यांनी व्यक्त केला. 

आदिवासी हा केवळ जंगलाचे संवर्धन करित नाही तर तो आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे व पर्यायाने देशाचे संवर्धन करतो.

 म्हणूनच संस्कृती आणि संस्कारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी सेटट्राइब संस्थेची निर्मिती केली होती अशी प्रतिक्रिया सेटट्राइबचे संचालक श्री सारंग वाकोडीकर ह्यांनी व्यक्त केली. 

ह्या प्रसंगी जेष्ठ प्रत्रकार प्रदीप वाकोडीकर, सेटट्राइब आयटी सोल्युशन्स च्या संचालिका सौ.रागिणी वाकोडीकर,

 सेटट्राइब चे डेव्हलपर्स व विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

सेटट्राइब ही ग्रामीण भागातून उदयास आलेली महाराष्ट्रातील पहिली आयटी कंपनी आहे. संस्थेद्वारे ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संगणकाचे व माहिती 

तंत्रज्ञानाचे अद्ययावत प्रशिक्षण देवून त्यांच्या मार्फत सॉफ्टवेअर व वेबसाईट्स तयार करून घेवून तयार झालेले 

सॉफ्टवेअर्स राज्यभरातील विविध शासकीय कार्यालये व खाजगी संस्थांना वितरित करून ह्याद्वारे रोजगारनिर्मिती करण्यात येत आहे. 

ह्या आयटी कंपनीच्या  द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी पुढे बोलताना श्री कीर्ति किरण पुजार 

ह्यांनी सेटट्राइब मध्ये आंतराष्ट्रीय दर्जाचे सॉफ्टवेअर तयार करणार्‍या व अद्ययावत तंत्रज्ञान अवगत असेलेल्या 

किनवटमधील सॉफ्टवेअर डेव्हलपर्स चे कौतूक केले तसेच पुणे, अमरावती, 

यवतमाळ, नांदेड शहरातून येऊन किनवट मध्ये वन डे ऑन फ्लोअर ह्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला. 

आयटी मध्ये नौकरी मिळवलेल्या सेटट्राइबच्या विद्यार्थ्यांच्या पाठिवर माननीय सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांनी कौतुकाची थाप दिली. 

शासकीय आश्रम शाळा, किनवट, छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय किनवट ह्यासह विविध 

शाळा व महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळेला भेट देवून सॉफ्टवेअर कसे तयार केले 

जातात ह्याचे प्रात्यक्षिक पाहिले. बाहेरगावातून आलेल्या सेटट्राइबच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 28 रोजी 

वडोली येथील दत्त मंदिरामध्ये वनभोजनाचा कार्यक्रम गावच्या सरपंच पार्वता आत्राम, श्री राजू पाटील सोळंके, श्री महाजन, 

श्री मडावी ह्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. पारंपारिक पद्धतीने सेटट्राइबच्या चमुचे स्वागत करून घुसाडी, 

ढेमसा आदि नृत्यप्रकार सादर करणार्‍या गावकर्‍यांनी आमचे मन जिंकल्याची प्रतिक्रिया सेटट्राइबच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.