Ticker

6/recent/ticker-posts

२५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अयोध्येच्या 'शरीफ चाचां'नी स्वीकारला 'पद्मश्री'हजारो बेवारस मृतदेहांना अखेरचा सन्मानजनक निरोप देणाऱ्या अयोध्येतील 'शरीफ चाचा'


२५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अयोध्येच्या 'शरीफ चाचां'नी स्वीकारला 'पद्मश्री'

हजारो बेवारस मृतदेहांना अखेरचा सन्मानजनक निरोप देणाऱ्या अयोध्येतील 'शरीफ चाचा' 

म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेवक मोहम्मद शरीफ यांना सोमवारी 'पद्मश्री' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
 हस्ते शरीफ चाचांनी

 हा पुरस्कार स्वीकारला.
बेवारस मृतदेहांचे 'मसीहा' म्हणून शरीफ चाचांची ओळख आहे. 

गेल्या २५ वर्षांत जात-धर्म भेदभाव
 बाजुला सारून

 त्यांनी जवळपास २५ हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.


शरीफ चाचांची 'पद्मश्री' पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पत्र त्यांना २०२० साली मिळालं होतं. 

परंतु, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार त्यांनी काल (सोमवारी) स्वीकारला.