Ticker

6/recent/ticker-posts

*टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे रूगणांना फळ वाटप*.किनवट/ सय्यद नदीमटिपू सुलतान ब्रिगेड उमरी तर्फे आज देशाचे प्रथम स्वातंत्र्य सैनिक, पहिले मिसाइल मैन शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय उमरी येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले


टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे रूगणांना फळ वाटप.
किनवट/ सय्यद नदीम
टिपू सुलतान ब्रिगेड उमरी तर्फे आज देशाचे प्रथम स्वातंत्र्य सैनिक, 

पहिले मिसाइल मैन शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय उमरी येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले. 

टिपू सुलतान यांना इंग्रजाविरूद्ध स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने शहीद होणारा एकमेव राजा म्हणून ओळखले जाते. 

परंतु टिपू सुलतान हे उत्तम शासक, असामान्य योद्धा तर होतेच त्याचबरोबर


टिपू सुलतान हे वैज्ञानिक, समाज उद्धारक, तत्ववेत्ते, संशोधक, भूगर्भशास्त्रज्ञ, यांत्रिकी अभियंता, यशस्वी उद्योजक, साहित्यिक, युद्ध व्यवस्थापन तज्ञ, 

शेतकऱ्यांचे कैवारी, धर्म सहिष्णु असे विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे एकमेव अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होय.


नशामुक्त राज्याचे संस्थापक टिपू सुलतान आपल्या प्रजेची काळजी पोटच्या लेकराप्रमाणे घेत.


टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी यावेळी सांगितले की टिपू सुलतान हे फक्त राजे नसून 

राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक एकात्मतेची प्रेरणा देणारी व
देशाला महाशक्ती बनवणारी विचारधारा आहे. 


याप्रसंगी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. मोहन भोसले साहेब, वैद्यकीय अधिकारी डाॅ. मारोती चंदापुरे, छत्रपती युवा सेना जिल्हाध्यक्ष रईस पठाण,

 टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान, जिल्हा संघटक फयाज पठाण, उमरी तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, 

विद्यार्थी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सय्यद सुलेमान, नजीर बेग, अलमास पटेल, जमील भाई इ.ची उपस्थिती होती.