महिंद्रा होम फायनान्स वसुली अधिकाऱ्यांची लूट करणाऱ्या लोकांवर लुटमारीचा गुन्हा दाखल
किनवट (तालुका प्रतिनिधी) विश्वविख्यात महिंद्रा कंपनीने सर्वसामान्याला घर बांधण्यासाठी ग्राहकांच्या मागणीवरून कर्ज दिले
सर्वसामान्यांना घर राहण्याचे स्वप्न परिपूर्ता हाच उद्देश सदर कंपनीचा आहे सदर कंपनीने दिलेले
पैसे कंपनीचे वसुली अधिकारी परतफेड करण्याची कर्जदाराला विनंती करत असता अनेक ठिकाणी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रकार घडत आहेत
किंबहुना वसुली अधिकाऱ्यांची लूटमार करावी या मर्यादेपर्यंत या सीमेपर्यंत लोकांची मानसिकता तयार झालेली आहे
सदर बेकायदेशीर कृतीवर आळा घालण्यासाठी किंबहूना घडलेल्या बाबीची दखल घेऊन
भोकर ता. भोकर जिल्हा नांदेड येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 0419/2021
दि. 11/ 11 2021 रोजी कलम 392, 323, 504, 506, 34 भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादी मध्ये
मी विठ्ठल रामचंद्र मेकेवार वय 29 धंदा:- खाजगी नौकरी रा. येवली ता. हदगाव जी. नांदेड समक्ष पोलीस स्टेशनला
येवून तक्रार सांगुन जबाव नोंद विण्यास सांगतो की मी वर राहणार प्रमान असून महिंद्रा हाउसिंग फायनान्स कंपनी कडून वसुली अधिकारी म्हणून दोन वर्षापासून काम पाहतो.
दि. [11/11/202| 10.30 वाजता मौजें बेबर येथे मी व माझा मित्र संतोष गणेशराव तोटेवाड यांचे सह विजय भोसले
योचे घरी. मौजे बेमबर येथे गेलो असता विजय हा घरी नव्हता त्यांचे वडील गणेश भोसले हे होते
त्यावेळी मी व गणेश भोसले यात वेचन दिलेल्या फायनान्स रक्कमेबाबत बातचीत चालू असताना
मौजे बेंबर येथील राहणारे 1. साईनाथ बालाजी भोसले 2. राजु गोविंद भोसले 3. दिगांबर बालाजी भोसले या तिघानी ल्या ठिकाणी येवून
माझ्या काकाला रोज रोज येऊन पैशासाठी तंग का करता म्हणून साईनाथ भोसले याने मला व माझा मित्र संतोष
याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यांना आम्ही असे शिव्या का देता म्हणता राजु गोविंद भोसले यांनी तुला दाखवू का
आता म्हणून माझे डावे कानावर जोराने थापड आणि मारले मला चक्कर आल्याने
मी खाली पडलो असता वरील तिघांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
ह्यापैकी माझे खिशातील फायनान्स चे पैसे साईनाथ बालाजी भोसले यांनी जबरीने काढून घेतले आहेत
माझे "मित्र संतोष यास वीट उगारून मारहान करण्याची धमकी दिली आहे.
तरी 1.साईनाथ बालाजी भोसले 2, राजु गोविंद भोसले 3. दिगांबर बालाजी भोसले सर्व रा. बेबर ता. भोकर जि. नांदेड
यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी.
अशा प्रकारची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
कायद्याला अनुसरून नियमाप्रमाणे कर्ज देणाऱ्या कंपनीचे कर्ज परत फेड होणे गरजेचे आहे
किंबहुना त्यामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे परंतु कायदा हातात घेणाऱ्यांची नराधमाला किंबहुना
बेजबाबदार गुन्हेगारांना कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी अशी भावना जनसामान्यात बोलल्या जात आहे.
सदर गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद उद्धवराव जोंधळे हे पुढील तपास करत आहेत