Ticker

6/recent/ticker-posts

शासन मान्य प्रेस पत्रकार संपादक व पत्रकार सेवा संघचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना व वृद्ध आश्रमात फळ फळावळ वाटप कार्यक्रम सम्पन्न


शासन मान्य प्रेस पत्रकार संपादक व पत्रकार सेवा संघचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना व वृद्ध आश्रमात फळ फळावळ वाटप कार्यक्रम सम्पन्न

किनवट/प्रतिनिधी:  पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे सोडवणारी, त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून 

येणारी सामाजिकतेचे भान ठेवून सामाजिक कार्यक्रमात आग्रहाने सहभागी होणारी 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ गेल्या 2 वर्षापासून स्थापना झाली असली तरी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली 

 अख्या महाराष्ट्रामध्ये अल्पावधीतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्या पर्यंत पोहचली आहे .
या शासन मान्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे सर 

यांचा वाढदिवस आज दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे साजरा करण्यात येत आहे.
   
 त्यानिमित्ताने किनवट तालुका कार्यकारणी च्या  वतीने सकाळी 11 वाजता 

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व संथगार वृद्ध आश्रमात फळ वाटप  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच या कार्यक्रमानिमित्त किनवट तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांना प्रेस 

संपादक पत्रकार सेवा संघाचे ओळखपत्र व नियुक्ती पत्राचे वाटप नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव,

 तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसीर तगाले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.