Ticker

6/recent/ticker-posts

देशाला IIT,IIM,UGC देणारे पहिले शिक्षणमंत्री,महात्मा गांधी ज्यांना 'ज्ञान सम्राट' म्हणायचे अश्या भारतरत्न मौलाना आझाद जयंतीदिन व राष्ट्रीय शिक्षा दिनानिमित्त


देशाला IIT,IIM,UGC देणारे पहिले शिक्षणमंत्री,महात्मा गांधी ज्यांना 'ज्ञान सम्राट' म्हणायचे अश्या भारतरत्न मौलाना आझाद जयंतीदिन व  राष्ट्रीय शिक्षा दिनानिमित्त

मौलाना आझाद म्हणजे भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक मोलाच आणि अतुल्य योगदान व असणारी व्यक्ती.

ते एक विद्वान पत्रकार,लेखक,कवि,इस्लामचे अभ्यासक,हिंदु-मुस्लिम एकतेचे कट्टर समर्थक होते.तसेच विविध भाषेवर त्यांची पकड़ होती

 त्यात अरबी,फारसी,उर्दू,इंग्रजी सोबत गणीताचा विशेष अभ्यास.वाचनाची प्रचंड आवड.त्यांचा जास्त खर्च पुस्तके खरीदी करण्यावर होत असे.

ते एक उत्तम लेखक ही होते.विविध भाषा चांगल्या अवगत होत्या व ते त्या भाषांतून लिखाणही करीत असत.

मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्याचा केलेला अनुवाद ‘तर्जुमानुल कुरान’ प्रसिद्ध आहे .

ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते.

ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावंत कार्यकर्ते होते.फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

वयाच्या 12 व्या वर्षी ते एक ग्रंथालय चालवत,वयाच्या पंधराव्या वर्षी ते वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या मुलांना शिकवत 

असे,वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी स्वतःहा ची एक पत्रिका(वर्तमानपत्र) काढले होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.स्वातंत्र्य लढ्यातील विविध प्रमुख आंदोलनात सक्रिय सहभागी होते 

त्यात असहकार,खिलाफत, भारत छोड़ो सारखे आंदोलन असोत किंवा अन्य आंदोलन असोत.

ते दोन वेळा राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष राहिले.पहिल्या वेळी 1923 ला वयाच्या 35 व्या वर्षी ते काँग्रेस अध्यक्ष झाले.

1940 मध्ये दुसऱ्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष झाले.स्वतंत्र चळवळीतील ते एक महत्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

स्वातंत्र्य लढ्यानंतर स्वातंत्र्य भारताचे ते पहिले कॅबिनेटचे शिक्षणमंत्री झाले व नंतर शिक्षा आणी प्राकृतिक संसाधन व वैज्ञानिक अनुसंधान मंत्री झाले.


त्यांनी संगीत नाटक आकादमी(1953),
साहित्य आकादमी(1954),
ललित कला आकादमी(1954) ,


भारतीय सांस्कृतिक सबंध परिषद,
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC),
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपुर 1951 साली मग 

मुंबई,चैनई,कानपुर,दिल्ली याठिकाणी ह्या महत्वाच्या संस्थांची स्थापना केली.


आणि म्हणूनच आजच्या वर्तमान शिक्षण नीतीचे जनक म्हणून मौलाना आझाद यांना ओळखले जाते.

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून जे कार्य केल ते अतिशय मोलाच होत.त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. 

आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यानांच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.म्हणूनच त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

अश्या अतिशय थोर,स्वातंत्र्य लढ्यातील मोलाचं योगदान देणाऱ्या विद्वान व्यक्तीमहत्वाची आज जयंती ...

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!💐❤️

-इरफान शेख

#मौलानाआझाद 
#MaulanaAbulKalamAzad
#NationalEducationDay