Ticker

6/recent/ticker-posts

विधान भवनावर पेन्शनसाठी लॉंगमार्च 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकिय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक डीसीपीएस/एनपीएस योजना लादले असून ही योजना शेअर मार्केटवर आधारीत असल्याने फसवी योजना आहे


*विधान भवनावर पेन्शनसाठी लॉंगमार्च*

            1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकिय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक डीसीपीएस/एनपीएस योजना लादले असून ही योजना शेअर मार्केटवर आधारीत असल्याने फसवी योजना आहे.

समान काम समान वेतन या विचाराला फाटा देत संविधानीक हक्काच्या पेन्शन पासुन कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्यात आले असून या नव्या पेन्शन योजनेमुळे गेल्या सोळा वर्षात कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नाही.

ही अत्यंत गंभीर बाब असून मयत कुटुंबीयांना सरकारने कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना अध्यापही चालु केलेली नाही.

या फसव्या नव्या पेन्शन योजनेमुळे मयत कुटुंब आजही उघड्यावर दिसतं असून त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. समान काम समान वेतन या धर्तीवर 1नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या 

सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी.या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 2005 पासुन नागपुर , 

मुंबई विधानभवन व सर्व जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाखोच्या संख्येने धरणे , आक्रोश मोर्चा , मुंडण आंदोलन , 

दिंडी घंटानांद , अनेक उपोषण अशा विविध लोकशाही मार्गातून गेली सात वर्षे सातत्यानं अनेक प्रकारचे असंख्य आंदोलने केली आहेत.  

सरकार मात्र संघटनेला फक्त आश्वासन देत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे कामं केले आहे.
      

 यामुळे 100पेक्षा जास्त विविध संघटनेला एकत्र करून जुनी पेन्शन समन्वय संघटनेच्या वतीने 22नोव्हेंबर ते 8डिसेंबर या कालावधी मध्ये संयोजक वितेश खांडेकर 

यांच्या नेतृत्वात संपुर्ण जिल्ह्यात राज्यभर पेन्शन संघर्ष यात्रा काढण्यात आली असून या पेन्शन संघर्ष यात्रेत त्या त्या जिल्ह्यातील सर्व विभागातील हजारो कर्मचारी , 

स्थानिकचे आमदार खासदार यांनी सहभागी झाले होते.या सर्व संघटनेच्या वज्रमुठीतुन 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणुन सर्व शासकीय कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले असून पेन्शन संघर्ष यात्रेच्या 

फलितातुन कल्याण ते मुंबई पायी पेन्शन लॉंग मार्चसाठी सर्व कर्मचारी लाखोच्या संख्येने 21डिसेंबर रोजी मुंबई विधानभवनावर धडकणार आहेत. 

तेथे ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातुन रेनगुंटवार यांनी नांदेड ते मुंबई असा सायकलिंग प्रवास करत आहेत. 

अशा महत्वपूर्ण स्वतः च्या हक्काच्या जुनी पेन्शन मागणीच्या संघर्षमय आंदोलनात किनवट तालुक्यांतील सर्व विभागातील कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे 

आवाहन तालुकाध्यक्ष गोपाल कन्नाके , सुमेध भवरे , कृष्णा सुंकलवाड , अनमोल गायकवाड , विष्णु मुनेश्वर , विश्वनाथ आडे , नागेश बबिलगेवार , आदीने केले आहेत.