Ticker

6/recent/ticker-posts

17 व 18 डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील 100 गावात "मिशन 10 हजार" विशेष लसीकरण मोहिम-सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण


17 व 18 डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील 100 गावात "मिशन 10 हजार" विशेष लसीकरण मोहिम
-सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार

किनवट : 100 टक्के लसीकरण  उदिष्टपूर्ती साठी शुक्रवार व शनिवार ( दि .17 व 18 डिसेंबर ) रोजी तालुक्यातील 100 गावात "मिशन 10 हजार" विशेष लसीकरण मोहीम पुनःश्च राबविण्यात येणार आहे, 

तेव्हा ग्रामपातळीवरील सर्व ग्रामनायक, अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने कार्य करून 100 टक्के लसीकरण करून घ्यावे व लाभार्थींनीही पुढं येऊन लस टोचून घ्यावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले आहे.
      
  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे सोमवार ( दि.15 ) रोजी किनवट दौऱ्यावर आले होते. यावेळी घेतलेल्या बैठकीत ते असे म्हणाले की, आपण वेगवेगळे उपक्रम राबविले परंतु किनवट तालुका लसीकरणात जिल्ह्यात शेवटी आहे. 

तेव्हा सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ज्याप्रमाणे 2 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी तालुक्यात साडेआठ हजार लसीकरण केले. 

त्याचप्रमाणे शुक्रवारी व शनिवारी तालुक्यातील 100 गावात "मिशन 10 हजार" विशेष लसीकरण मोहीम पुनःश्च राबवावी व 100 टक्के लसीकरण करून घ्यावे.
      
   दि.10 रोजीच्या आढावा बैठकीतही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी वैद्यकीय अधिकारी, 

मंडळ अधिकारी , विस्तार अधिकारी , ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, कृषी सहायक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशावर्कर ,

 पोलिस पाटील, सरपंच या गावपातळीवरील सर्वांनी एकत्र येऊन मतदार यादीप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून 18 तारखेपर्यंत लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे आवाहन केले होते.   
           

यानुषंगाने सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव व गट विकास अधिकारी सुभाष धनवे 

यांच्या नेतृत्वात तालुक्यात 'मिशन 10 हजार' ही  विशेष लसीकरण मोहिम 100 गावात राबविण्यात येत आहे. 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, 

गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व बाल विकास प्रकल्पाधिकारी आश्विनी ठकरोड यांनी ही मोहिम फत्ते करण्याठी आखणी केली आहे. 

17 व 18 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी हे तालुक्यातील लसीकरण केंद्रास भेट देऊन पूर्णवेळ थांबून पाहणी करणार आहेत. 

तेव्हा या मोहिमेत वैद्यकीय विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, 

आशावर्कर, पोलिस पाटील, सरपंच आदि ग्रामस्तरावरील सर्वांनी लसीकरण पूर्णत्वास नेण्यासाठी सेवाभावी वृत्तीने स्वतःला झोकून देऊन काम करावे व लाभार्थींनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या 

सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले आहे. असे मिडिया व जनजागृती कक्षाचे उत्तम कानिंदे यांनी कळविले आहे.