Ticker

6/recent/ticker-posts

बेल्लोरी व आदिवासीबहुल कोलामखेडा येथे 97 % कोरोना लसीकरण ; 97 वर्षाच्या गंगामाईनी घेतली कोरोना लस


बेल्लोरी व आदिवासीबहुल कोलामखेडा येथे  97 % कोरोना लसीकरण ; 97 वर्षाच्या गंगामाईनी घेतली कोरोना लस!..

किनवट : "शासनाच्या वतीने 18 वर्षावरील सर्वांना लस मोफत देण्यात येत आहे. 

लस घेतल्यानंतर संसर्ग झाला तरी सुरक्षित रहाता येत. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी लस घ्यावी!"...

केलेल्या जनजागृतीच्या परिणामामुळे 'हर घर दस्तक' मिशन 10,000 अंतर्गत एस.व्ही. एम.परीसर, बेल्लोरी व आदिवासीबहुल कोलामखेडा

 या गावात   97 % कोरोना लसीकरण झालेले असून 97 वर्षीय गंगामाई रामलु चनमनवार यांनी  कोरोना लस घेऊन कोरोना लढ्यास बळ दिले आहे.  
    

  वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे ,डॉ. किरण नेम्माणीवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गुंटापेल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ.चक्रवर्ती चंद्रे, डॉ. ज्योती सोनटक्के, 

औषध निर्माता श्रीनिवास ताटे, परिचारिका सुजाता नलावडे व मेश्राम हे या केंद्रावर लस देण्यास कार्यरत होते. 

या चमूला राजा तामगाडगे, लक्ष्‍मण वाडगुरे, जियाउद्दिन बक्षोद्दीन , त्रिमकदार, भोयर, सुमित चिंतकुंटलवार, संजय तिरमनवार या 
शिक्षकांनी सहकार्य केले.

 केंद्रप्रमुख रमेश राठोड यांच्या नेतृत्वात बेल्लोरी येथील मुख्याध्यापक उल्हास सुदेगुणेवार व सह शिक्षिका हेमलता चाटे- कागणे यांनी येथे लसीकरण जनजागृतीची व्यापक मोहीम आखली होती. 
      

 या सर्वांचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसीलदार मृणाल जाधव, गट विकास अधिकारी सुभाष धनवे , 

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे तसेच गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी कौतुक केले आहे.