Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी— कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण मोहीमे अंतर्गत "हर घर दस्तक" गतीमान करण्यासाठी नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर/घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे व जिल्हा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी किनवट तालुक्याकडे विशेष लक्ष दिले


किनवट/प्रतिनिधी— कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण मोहीमे अंतर्गत "हर घर दस्तक" गतीमान करण्यासाठी नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर/घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे व जिल्हा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर 

यांनी किनवट तालुक्याकडे विशेष लक्ष दिले असून, किनवट पंचायत समितीमध्ये आज आढावा बैठक होऊ घातली आहे. 

बोधडी येथे भेट दिल्याने पं.स.सदस्या सत्यभामाबाई मुंडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
         
  कोवीड १९ समूळ उच्चाटनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष लसीकरण मोहिमे अंतर्गत "हर घर दस्तक" लसीकरण कार्यक्रम गतीमान करण्यासाठी प्रशासनाने  किनवटवर विशेष लक्ष दिले आहे. 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर/घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे व जिल्हा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

 यांनी आज (१० डिसेंबर) तालुक्यातील लसीकरणासंदर्भात मदौरा काढला. 

दरम्यान दुपारी बोधडी बु.येथे भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. 

त्यावेळी पंचायत समिती सदस्या सत्यभामाबाई मुंडे यांच्या निवासस्थानी गजाननराव मुंडे व विष्णू कराड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
        

  पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी लसीकरणा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले 

असून त्यानंतर पुन्हा  लसीकरणाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे समजते.

 त्या तुलनेत किनवट तालुका हा लसीकरणाच्या बाबतीत मागे असल्यामुळे प्रशासनाने किनवटवर लक्षाकर्शीत केल्याचेही बोलल्या जात आहे.