Ticker

6/recent/ticker-posts

किनवट: तालुक्यातील वाळकी (बोधडी) येथील लक्ष्मण जटाळे (वय वर्षे ६०) यांना छातीचा त्रास अधिकच होत असल्याने बोधडी येथील डॉक्टरांणी त्यांना समोरील उपचारासाठी सुंदर हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर किनवट येथे पाठवण्यात


किनवट: तालुक्यातील वाळकी (बोधडी) येथील लक्ष्मण जटाळे (वय वर्षे ६०) यांना छातीचा त्रास अधिकच होत असल्याने बोधडी येथील डॉक्टरांणी त्यांना समोरील उपचारासाठी सुंदर हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर किनवट येथे पाठवण्यात आले.

पेशंट ला सुंदर हॉस्पिटलमध्ये आणले असता मोठा अटॅक होता. 

व रक्त दाब अतिशय कमी होता. डॉ.वसंत बामणे यांनी रुग्णाला तपासताच रुग्णाला मोठा हृदयविकाराचा झटका असल्यामुळे ताबडतोब उपचार सुरू केले.

 ब्लॉक काढण्याचे इंजेक्शन दिले.

रक्त दाब कमी व अटॅक मोठा असल्याने हृदय वारंवार बंद पडत होते.

सुमारे तीन तासात १७ वेळा हृदय बंद पडले व १७ वेळा रुग्णाला शॉक देऊन रुग्णाचे जीव वाचविण्यास यश आले.

तीन दिवसानंतर पेशंट बरा होऊन घरी परतला
किनवट सारख्या अति दुर्गम भागात रुग्ण सेवा देत असतांना अनेक अडचणी येतात.

किनवट तालुका हा जिल्ह्या पासून सुमारे १५० किमी असल्याने अनेक वेळा रुग्णांना आपले प्राण ही गमवावे लागले.

मात्र आम्ही सुंदर हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर च्या माध्यमातून आज पर्यंत २३ रुग्णांचे प्राण वाचवू शकलो. 

किनवट च्या इतिहासात प्रथमच पहिली वेळेस शॉक देऊन आत्ता पर्यंत २३ रुग्णांना जीवनदान दिल्याचे डॉ. वसंत बामणे यांनी सांगितले