Ticker

6/recent/ticker-posts

बळीराम पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट येथे आजादी का आमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५/१२/२०२१ रोजी सुद्ढ भारत सक्षम भारत या


बळीराम पाटील  महाविद्यालयात 
सिकलसेल शिबीर  संपन्न 
(किनवट- प्रतिनिधी)
  बळीराम पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट  येथे आजादी का आमृत महोत्सवी वर्षानिमित्त  राष्ट्रीय सेवा 

योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५/१२/२०२१ रोजी सुद्ढ भारत सक्षम भारत या संकल्पनेतुन 

*सिकलसेल शिबिराचे** आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांच्या हस्ते झाले. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सिकलसेल ची चाचणी करू व सिकलसेल टाळू या उद्देशाने आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी संयुक्तपणे काम केले. 

सदरील शिबीरामध्ये एकूण ११८ विध्यार्थी पैकी ४३ मुले व ७५ मुलींनी चाचणी करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.  शिबीर सकाळी सकाळी १०:३० पासून सुरु झाले

महाविद्यालय रासेयो  विभाग व स्थानिक आरोग्य यंत्रणा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मध्ये सिकलसेल ची जागृती करण्यात आली आहे.
या शिबीरास प्रयोग शाळा सहाय्यकशेख अब्दुल रजाक व  समुपदेशक पंकज राठोड यांनी विद्यार्थाची चाचणी करूण अहवाल प्राचार्य डाँ एस.के.बेंबरेकर यांना दिला.

ह्या शिबीरात पर्यवेक्षक प्रा अनिल पाटील,राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, प्रा हटकर मॅडम, 

प्रा, पेंडलवाड,इंग्रजी विभागाच्या प्रा. ममता जोनपेल्लीवार, करन वर्मा  आर्शद, रवी हाट्टे रासेयो स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने यांनी केलेतर उपस्थितांचे आभार प्रा सुलोचना जाधव यांनी मानले.