शास्त्री महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जहिरूद्दीन पठाण यांनी अल्पसंख्यांकांचे हक्क आणि अधिकार या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना
कार्यक्रमाधिकारी प्रा. संभाजी मनूरकर यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
डॉ. पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांकांचे हक्क व अधिकार या विषयी संवैधानिक तरतुदी सांगून त्यांचे हक्क,
अधिकार,संस्कृती, भाषा, व वंशाचे संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या योजना व उपक्रमांची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डाॅ. श्रीराम गव्हाणे यांनी महामानवांचे विचार व संवैधानिक कायदे व तरतुदी विषयी विद्यार्थ्यांनी जागृत राहावे, असे मत व्यक्त केले.